Sandipan Bhumre : ना सावे, ना शिरसाट, विधानसभा निवडणुकीपर्यंत भुमरेच पालकमंत्री

Chhatrapati Sambhajinagar MP Sandipan Bhumre : राज्यमंत्री मंडळाचा विस्तार केला जाणार असल्याच्या चर्चा मध्यंतरी सुरू झाल्या होत्या. मात्र हा विस्तारही होण्याची चिन्ह किंवा हालचाली राज्य पातळीवर होताना दिसत नाहीत.
sanjay Shirsat, MP Sandipan Bhumre, Atul Save
sanjay Shirsat, MP Sandipan Bhumre, Atul Save Sarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News, 23 June : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे संदीपान भुमरे विजयी झाले आहेत. आता ते संसदेचे सदस्य झाल्याने त्यांनी विधीमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा चौदा दिवसांत देणे बंधनकारक आहे. विधीमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला तरी ते मंत्रीपदावर कायम राहू शकतात, अशी कायद्याने तरतूद असल्याचे सांगितले जाते.

त्यामुळे संदीपान भुमरे खासदार झाले असले तरीही आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपर्यंत रोजगार हमी योजना व फलोत्पादन खात्यासह जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांच्याकडेच कायम ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्याची माहिती आहे.

त्यामुळे भुमरेंच्या राजीनाम्यानंतर पालकमंत्री पदाकडे डोळे लावून बसलेले शिवसेनेचे (Shivsena) आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट व अचानक भाजपने पालकमंत्री पदावर दावा केलेले मंत्री अतुल सावे यांच्या पदरी निराशाच येण्याची शक्यता अधिक आहे.

राज्यमंत्री मंडळाचा विस्तार केला जाणार असल्याच्या चर्चा मध्यंतरी सुरू झाल्या होत्या. मात्र हा विस्तारही होण्याची चिन्ह किंवा हालचाली राज्य पातळीवर होताना दिसत नाहीत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबरमध्ये लागण्याची शक्यता आहे. जून महिना संपत आल्यामुळे जेमतेम दोन महिने विधानसभेची आचारसंहिता लागण्यासाठी उरणार आहे. एवढ्या कमी कालावधीसाठी राज्य सरकार मंत्रिमंडळ विस्तार करण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

sanjay Shirsat, MP Sandipan Bhumre, Atul Save
Manoj Jarange Patil : मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण द्या, कसं देत नाही ते बघतोच; जरांगे-पाटलांचा सरकारला इशारा

या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची देवेंद्र फडणवीस, अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यांचं सांगितलं जात आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न निकाली निघाल्याची माहिती समोर येत आहे. भुमरे लोकसभेवर निवडून आल्यानंतर आमदार संजय शिरसाट यांची मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागून त्यांना पालकमंत्री पद दिले जाईल, असा विश्वास त्यांचे समर्थक बाळगून होते.

तर दुसरीकडे संभाजीनगरच्या स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत पालकमंत्रीपद अतुल सावे यांना मिळावे, अशी मागणी केली होती. लोकसभा निवडणुकीत संदीपान भुमरे यांचा विजय भाजपमुळे झाल्याटा दावा करत बक्षिस म्हणून मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्रीपद अतुल सावे यांना द्यावे, अशी मागणी केली होती.

sanjay Shirsat, MP Sandipan Bhumre, Atul Save
Dr. Shobha Bachhav : खासदार शोभा बच्छाव यांच्यासमोर धर्मसंकट, विधानसभेला कोणाचा प्रचार करणार?

मात्र, आता या सगळ्यावर आता पडदा पडल्याचे दिसत आहे. कारण विधीमंडळाचा सदस्य नसताना सहा महिने मंत्रीपदावर कायम राहता येऊ शकते, या तरतूदीमुळे पुढील दोन महिने म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपर्यंत संदीपान भुमरे हेच जिल्ह्याचे पालकमंत्री असतील हे जवळपास निश्चित समजले जात आहे. या संदर्भात संदीपान भुमरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com