Manoj Jarange Patil : मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण द्या, कसं देत नाही ते बघतोच; जरांगे-पाटलांचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil On Muslim Reservation : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठ्यांसह राज्यातील सर्व मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण द्यावं, अशी मोठी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठ्यांसह राज्यातील सर्व मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण द्यावं, अशी मोठी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. शिवाय सरकार मुस्लिमांना आरक्षण कसं देत नाही, ते मी बघतोच, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असे लेखी आश्वासन राज्य सरकारने दिल्यानंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे (Laxman Hake and Navnath Waghmare) यांनी आपलं उपोषण स्थगित केलं. मात्र, त्यांच्या उपोषणस्थळी ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर बोचरी टीका केली.

शिवाय राज्य सरकार ओबीसींच्या मागण्यांसाठी सकारात्मक असल्याचंही ते यावेळी म्हणाले. तसंच ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी एक उपसमितीही स्थापन करण्यात येणार आहे. या सर्व प्रकरणावरुन आता जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आक्रमक पवित्रा घेतला आहे.

काहीही झालं तरी मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळवून देणारच, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. शिवाय केवळ मराठा समाजालाच नव्हे तर ज्यांच्या ज्यांच्या राज्यात कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्या सर्वांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मोठी मागणी जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधताना केली.

Manoj Jarange Patil
Sanjay Raut : 'स्ट्राइक रेट'वरुन राऊतांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका; म्हणाले, ते जिथे जातात तिथे...

यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, "माळी समाजाला व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलं असेल तर आम्हीदेखील तुम्हाला आमचे व्यवसाय दाखवतो. ते बागायती शेती करतात म्हणून त्यांना आरक्षण देण्यात आलं. आम्ही देखील शेतकरी मराठा (Maratha) म्हणून आमचा व्यवसाय दाखवतो. आम्हाला उत्तरं द्या, गोड बोलू नका. तुम्ही त्यांचे खूप लाड पुरवले. आमचा त्यांना विरोध नाही. तुम्हाला सर्वकाही संविधानाप्रमाणे पाहिजे ना, मग आम्हाला उत्तरं द्या त्यांना व्यवसायाच्या आधारावर आरक्षण कसं दिलं", असा प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केला.

Manoj Jarange Patil
Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच संजय राऊत नाशिकमध्ये... 'हे' आहे कारण!

मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे

तर राज्यातील मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतून (OBC) आरक्षण दिलं पाहिजे, आणि सरकार त्यांना आरक्षण कसं देत नाही ते मी बघतोच, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. जरांगे-पाटील म्हणाले, "मारवाडी, ब्राह्मण, लिंगायत आणि मुस्लिमांच्या सुद्धा सरकारी नोंदी निघाल्या आहेत.

जर त्यांच्या नोंदी शेतकरी कुणबी म्हणून निघाल्या असतील, तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे. त्यांच्यावर अन्याय होता कामा नये, आता सरकारने कायद्याने बोलावं. जर मुस्लिमांच्या नोंदी कुणबी म्हणून निघत असतील, तर राज्यातील सर्व मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण द्यावं आणि सरकार त्यांना आरक्षण कसं देत नाही, ते मी बघतोच."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com