Manoj Jarange Maratha Reservation  Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation : ...तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार; जरांगेंनी सरकारला ठणकावलं

Manoj Jarange Patil On Maratha Reservation Protest : मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवालीत पत्रकारपरिषद घेत राज्य सरकारला पुन्हा इशारा दिला आहे...

सरकारनामा ब्यूरो

Manoj Jarange Patil On Maharashtra Government GR :

ज्यांच्या नोंदी आढळल्या त्या आधारावर सग्यासोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. राज्य सरकारने शनिवारी तशी अधिसूचना जारी केली आहे. यामुळे ज्यांच्या नोंदी आढळून आलेल्या नाहीत त्यांना नोंदी आढळून आलेल्यांच्या नात्याने प्रमाणपत्र मिळणार आहे. तसेच सरकारने दिलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही आणि मराठा समाजाला लाभ होत नाही तोपर्यंत अंतरवालीत आंदोलन सुरूच राहणार आहे. मराठा समाजाला परिपूर्ण आरक्षण मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. आणि त्या शब्दावर ठाम असल्याचे मनोज जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले. अंतरवाली सराटीत Maratha समाजातील प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीनंतर जरांगे-पाटील यांनी पत्रकारपरिषद घेत बैठकीतील निर्णयांची माहिती दिली.

मुंबईतील मोर्चात जी अधिसूचना दिली गेली त्याची अंमलबजावणी होऊन पहिले प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. हे आंदोलन मराठ्यांनी शंभर टक्के जिंकलेले आहे. आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आम्ही रायगडावर दर्शनाला जाऊ, असे म्हटले होते, असे जरांगे म्हणाले.

आम्ही रायगडावर छत्रपती शिवरायांच्या दर्शनासाठी जातोय. उद्या आम्ही निघू आणि 30 जानेवारीला रायगडावर दर्शन घेऊ, अशी माहिती जरांगे-पाटील यांनी दिली. पहिले प्रमाणपत्र मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील मराठ्यांची प्रचंड मोठी विजयी सभा घेतली जाईल. काल एक दिवाळी झाली. आता अंमलबजावणी झाल्यानंतर दुसरी एक दिवाळी महाराष्ट्रात साजरी केली जाईल, असे जरांगे यांनी म्हटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्य सरकारने मराठा समाजासाठी सग्यासोयऱ्यांची काल जी अधिसूचना काढली आहे, त्याची तातडीने उद्यापासून अंमलबजावणी करावी. अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला. मराठवाड्याचे जे गॅझेट आहे 1884 चे ते शिंदे समितीला देऊन तातडीने ते लागू करावे. 1884 ची जनगणनाही लागू करावी. सातारा संस्थानचे गॅझेटही शिंदे समितीला देऊन तेही लागू करावे. यासोबत बॉम्बे गव्हर्न्मेंटचे गॅझेटही लागू करावे, अशी मागणी जरांगे-पाटील यांनी केली.

सरकारने अधिसूचनेची अंमलबजावणी तातडीने करावी. अधिसूचनेची अंमलबजावणी करून किमान एक प्रमाणपत्र जरी मिळालं तरीही आंदोलनाबाबतचा विचार त्या दिवशी केला जाईल. समाजासमोर ते सांगूनच पुढचा निर्णय घेतला जाईल, असे मनोज जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले.

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT