Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : जरांगे पाटील यांना अचानक सुरु झाली मळमळ, पुढचे २४ तास...

Manoj Jarange Patil Health Update : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. पुढचे २४ तास डॉक्टरांच्या निगराणी खाली त्यांना ठेवण्यात आलं आहे.

Ganesh Sonawane

Maratha Reservation : बीडमध्ये काल (शुक्रवार) सायंकाळी मराठा समाजातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. या दरम्यान मनोज जरांगेंची तब्येत अचानक खालावली. भाषण करताना प्रकृती साथ देत नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर मेळावा उरकून त्यांना तातडीनं हॉस्पिटलला हलवण्यात आलं.

मेळाव्यात भाषण सुरु असतानाच मनोज जरांगे पाटील यांना चक्कर येत होती. मात्र, सुरुवातीला त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. यानंतर जास्त चक्कर वाढल्याने त्यांनी खाली बसून भाषण केलं. पंरतु तब्येत जास्तच खालावल्याने मेळावा आटोपता घेत तत्काळ त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

बीड येथील डॉ. सुनील बोबडे यांच्या मेडीकेअर हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी त्यांच्या तपासण्या केल्या. यावेळी रक्ताचे नमुने देखील घेण्यात आले आहे. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मात्र, पुढचे २४ तास डॉक्टरांच्या निगराणी खाली त्यांना ठेवण्यात आलं आहे.

डॉक्टरांनी काय सांगितलं..

शुक्रवारी रात्री ९.३० वाजता मनोज जरांगे पाटील यांना अचानक मळमळ होत होती. त्यांना चक्कर येत होते. अशक्तपणा खूप होता. हात पाय थरथर करत होते. चक्कर येऊन थोडे पडल्यासारखे त्यांना झाले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी त्यांची तपासणी केल्यावर रक्तदाब कमी झाला होता. त्यांचा रक्तदाब जवळपास १०० च्या आसपास होता. तातडीने त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांचा रक्तदाब नॉर्मल(१२०) झाला आहे. त्यांच्या रक्ताच्या सर्व चाचण्या सामान्य आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

धनंजय देशमुखही होते उपस्थित

दरम्यान, मेळाव्यात मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील उपस्थित होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना जोपर्यंत फाशी मिळत नाही, तोपर्यंत आपण शांत बसणार नाही, असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. मराठा समाजाने एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT