Maratha, OBC Sarkarnama
मराठवाडा

Maratha Vs OBC : सरकारची धडधड आणखी वाढणार; मराठ्यांनंतर आता ओबीसीही मुंबईत धडकणार?

Prakash Shendge : आझाद मैदानावरून ओबीसी सरकारचा धिक्कार करणार...

Shital Waghmare

Maharashtra Political News : महाराष्ट्र सरकारने ओबीसीबांधवांना शब्द दिला होता की, आमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. परंतु सर्वेक्षण करून चुकीच्या पद्धतीने ओबीसी आरक्षणाला धक्का लावला जात आहे. त्यामुळे सर्व ओबीसीबांधव 26 जानेवारी रोजी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार आहेत. तेथे सरकारचा धिक्कार करण्यात येणार असल्याची माहिती ओबीसीनेते प्रकाश शेंडगे यांनी दिली.

ओबीसी (OBC) महाएल्गार मेळाव्याच्यानिमित्ताने ते धाराशिवमध्ये पत्रकारांशी बोलत होते. ओबीसी समाजाला महाराष्ट्र शासनाने शब्द दिला होता, की कुठल्याही परिस्थितीत समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. यासंदर्भात लेखी भूमिका सरकारने घेतली होती. उलट मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळवून देऊ, असे आश्वासन सरकारच्या वतीने मराठा समाजाला दिले होते. त्यास आता हरताळ फासण्यात येत असल्याची टीकाही शेंडगेंनी केली.

'महाराष्ट्र शासनाने 18 जानेवारी रोजी अध्यादेश काढून 54 लाख नोंदी आढळून आल्याचे सांगितले आहे. 54 लाख नोंदी घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 26 जानेवारीपर्यंत 54 लाख नोंदी घेण्याचे हे काम सरकार पूर्ण करणार असे चित्र आहे. हा शासन निर्णय काढून शासनाने ओबीसींची फसवणूक केली आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की, ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचा आम्ही धिक्कार करीत आहोत,' असे प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी यावळी सांगितले.

'हा ओबीसी समाज कुठल्याही परिस्थितीत स्वस्थ बसणार नाही. शासनाला धडा शिकविल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. यापूर्वी आठ आयोगाने सर्वेक्षण करून मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही, हे स्पष्ट केले आहे. आठ दिवसांत कोट्यवधी मराठा समाजाचा सर्व्हे करायचा हेसुद्धा सरकारचे षड्यंत्र आहे. ते आम्ही उधळून लावल्याशिवाय राहणार नाही,' असे शेंडगे स्पष्टच बोलले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'सर्वेक्षणाच्या अहवालाला आम्ही कोर्टामध्ये आव्हान देणार असल्याचेही शेंडगे यांनी स्पष्ट केले. 26 जानेवारीला महाराष्ट्रातील तमाम ओबीसीबांधवांनी आझाद मैदानात यावे, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या मुबलक साधनांसह उपस्थित राहून सरकारवर हल्लाबोल करण्याचा इशारा देतानाच कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी शासनाची राहील,' असा इशाराही शेंडगेंनी दिला.

(Edited by Sunil Dhumal)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT