Prakash Shendge : मनोज जरांगेंना प्रकाश शेंडगेंचा इशारा; म्हणाले, 'ओबीसी गाढवं, डुकरांसह...'

Maratha Vs OBC : 200 जेबसी, कोट्यावधींचे इंधन कुठून येते
Prakash Shendge
Prakash ShendgeSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. ते एकमेकांवर कडक शब्दात टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. बीडमधील जाळपोळीनंतर ओबीसी समाजही आरक्षण टिकवण्यासाठी आक्रमक झाला आहे. आता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावरून ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनीही जशास तसे उत्तर दिले आहे.

जालन्यातील लाठीचार्जनंतर बीडमध्ये मराठा आरक्षणाचे वादळ उठले. यातून घडलेल्या घटनेने आंदोलनाला गालबोट लागले. आमदारांची घरे, लोकांच्या जगण्याची साधने जाळली गेली. आता आरक्षणासाठी मराठा समाजाने २०२४ चा एल्गार पुकारला आहे. यावर प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) नी सडेतोड उत्तर दिले आहे. ते म्हणाले, मराठा समाज आरक्षणासाठी ते मुंबईत आले, तर ५० लाख ओबीसीही मुंबईत येतील. आमची गाढवे, डुकरे तयार आहेत, असा इशाराच शेंडगेंनी दिला.

Prakash Shendge
Ajit Pawar : बारामतीवरून अजित पवारांचा काकांना खडा सवाल; म्हणाले, 'बारामतीचा विकास कुणी...'

राज्याचे नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी येथील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकुलावर ओबीसी एल्गार परिषद झाली. यावेळी प्रकाश शेंडगे म्हणाले, 'आम्ही ७५ वर्षांपासून तुमचं वैभव सहन केले. आता ओबीसी एल्गार मराठ्यांची सत्ता उलथवून लावणार. तुम्ही सांभाळून रहावे,' असा इशारा देत 'मुंडेंचा कारखाना व भुजबळांच्या संस्था लयास लावल्या', असा आरोपही त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'कोपर्डी बलात्कार प्रकरणानंतर मराठा आरक्षणाचा वादळ सुरू झाले. यापूर्वी राज्यात मराठा समाजाचे तब्बत 58 मोर्चे शांततेत निघाले होते. गरीब म्हणून आरक्षण द्या, अशी मागणी झाली. आम्हीही हीच मागणी केली. आता ते आरक्षण सोडून ओबीसतून आरक्षण मागणी करत आहे. त्यांची ही मागणी कोणाच्या सांगण्यावरुन होत आहे,' असा खडा सवाल शेंडगे उपस्थित केला.

'यापुढे बीड जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार ओबीसींचेच असतील. कुणबी नोंदी बोगस असल्याचा आरोप करत शिंदे समिती रद्द करावी. मराठ्यांना ईडब्लूएस (EWS) आरक्षण असून ते आरक्षण वाढवून घ्या. ओबीसी आरक्षण शक्य नाही,' असेही शेंडगेंनी स्पष्ट केले. २०० जेबसी, कोट्यावधींचे इंधन कुठून येते, असा सवाल करत अशी गरीबी सर्वांना मिळावी, असे आपण पांडुरंगाला साकडे घातले,' असा टोलाच त्यांनी लगावला. 'ओबीसीतून आरक्षण दिले तर २०२४ च्या निवडणुकीत सरकारला घरचा रस्ता दाखविणार,' असाही इशारा शेंडगेंनी दिला.

(Edited by Sunil Dhumal)

Prakash Shendge
Pune Mahayuti Melava : मनोमिलन तर दूरच, पण रुसवे-फुगवे वाढले; महायुतीत बॅनरवरून वाद

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com