MP Ajit Gopchade News Sarkarnama
मराठवाडा

Ajit Gopchade News : शेतकरी आत्महत्या अन् दुष्काळग्रस्त मराठवाडा हा कलंक पुसायचायं! अजित गोपछडेंचे थेट अमित शहांना साकडे

Ajit Gopchade, Member of Parliament, meets Amit Shah to request a special fund for the development of Marathwada. : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होऊनही मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यात आलेला नाही. आजही मराठवाडा दुष्काळग्रस्त आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो.

Jagdish Pansare

Nanded Politics : राज्यसभेवर निवड झाल्यापासून फारसे चर्चेत नसलेले खासदार डाॅ. अजित गोपछडे यांनी आता नांदेड आणि मराठवाड्याच्या विकास कामावंर आपले लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. केंद्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मराठवाड्यातील शेती, सिंचन आणि आरोग्याच्या प्रश्नांवर गोपछडे यांनी दिल्लीत नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. नांदेड येथे शेती संशोधनासाठी आयसीएआरचे केंद्र सुरू करावे, अशी मागणी केल्यानंतर मराठवाड्यासाठी विशेष निधीसाठी गोपछडे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

मराठवाड्यातील पाणीपुरवठा, कृषी सिंचन, रोजगार, उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास या मूलभूत सोयी-सुविधांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अजित गोपछडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Saha) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी केंद्र सरकारने विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली. स्वातंत्र्यानंतर तब्बल एक वर्षानंतर मराठवाडा स्वतंत्र झाला, त्यामुळे इतर भागांच्या तुलनेत त्याचा विकास म्हणावा तसा झालेला नाही.

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होऊनही मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यात आलेला नाही. आजही मराठवाडा (Marathwada) दुष्काळग्रस्त आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. यामुळे हा कलंक पुसण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गोपछडे यांनी शहा यांच्यासोबतच्या भेटीत केली.

वॉटर ग्रीड प्रकल्प त्वरित सुरू करून पूर्णत्वास न्यावा, पाणी वाटपाचा न्याय्य तोडगा काढून कृषी सिंचनाच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना करावी. रोजगार निर्मिती व महिला आर्थिक सक्षमीकरणासह विकास व सहकार क्षेत्राला प्रोत्साहन द्यावे, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून अनुदान व मदतीची तरतूद करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याशिवाय बायोगॅस प्रकल्प सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष धोरण आणावे. मराठवाड्यात औद्योगिक विकास साधण्यासाठी नांदेडमध्ये सोयाबीन इंडस्ट्रीसारखे उद्योग सुरू करावेत.

रेल्वे व हवाई सुविधांसाठी नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी व विमान उड्डाण योजनेसाठी पावले उचलावीत. मराठवाड्यात वीज निर्मिती वाढवण्यासाठी विशेष धोरण आखून उर्जानिर्मीती प्रकल्प उभारावे, असेही गोपछडे यांनी अमित शाह यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले. या सर्व मुद्द्यांवर केंद्र सरकारने तातडीने लक्ष घालावे व मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निर्णय घ्यावेत, अशी विनंती अमित शाह यांना करण्यात आली आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT