BJP Gift for Muslims : मुस्लिमांसाठी भाजपचा मोठा प्लॅन; पक्षाने केली ‘सौगात-ए-मोदी’ची घोषणा...

Saugaat-e-Modi Announcement BJP Outreach to Muslim Community : बिहारमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. यापार्श्वभूमीवर हे किट वाटप होणार असल्याची चर्चा आहे.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : महाराष्ट्रासह देशभरातील अनेक भाजप नेत्यांकडून वादग्रस्त विधाने केली जात आहे. यापार्श्वभूमीवर भाजपने रमझान ईदचे निमित्त साधून मोठी घोषणा केली आहे. भाजपने उचललेले हे पाऊल ऐतिहासिक मानले जात आहे. देशभरातील गरीब मुस्लिमांना ईदनिमित्त सौगात-ए-मोदी हे किट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 32 लाख मुस्लिमांना किट दिले जाणार आहे.

भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाकडून ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत पक्षाचे 32 हजार पदाधिकारी 32 हजार मशिदींशी संपर्क साधून गरीब मुस्लिमांपर्यंत किट पोहचविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. मुस्लिम कुटुंबाला ईदनिमित्त भेट म्हणून हा पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Narendra Modi
Prashant Koratkar : कोरटकर तुमचा जावई आहे का? शिवप्रेमींचा पोलिसांना सवाल, त्याची गाढवावरून धिंड काढा

सौगात-ए-मोदी किट काय आहे?

सौगात-ए-किट ही गरीब मुस्लिमांसाठी एक भेट असेल. त्यामध्ये ईद साजरी करण्यासाठी आवश्यक साहित्य असणार आहे. शेवया, खजूर, सुकामेवा, बेसन, तूप-डालडा, महिलांसाठी सुती कपडे यांसह इतर काही आवश्यक वस्तूंचाही किटमध्ये समावेश असू शकतो. ही योजना मुस्लिम कुटुंबासाठी ईदचा आनंद वाढवणारी ठरेल, असे भाजपचे म्हणणे आहे.

भाजपची ही मोहिम आजपासून (ता. 25 मार्च) सुरू करण्यात आली आहे. याची सुरूवात नवी दिल्लीतील गालिब अकादमीतून होणार आहे. त्यामध्ये भाजपचा एक कार्यकर्ता 100 लोकांशी संपर्क साधेल. बिहारमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. यापार्श्वभूमीवर बिहारसाठी हे अभिमान राबवले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण बिहारसह इतर राज्यांमध्येही हे अभियान राबवले जाणार आहे.

Narendra Modi
Sadhvi Pradnyasingh Politics: साध्वी प्रज्ञासिंगला समाजवादी पार्टीचा झटका! काय आहे प्रकरण?

भाजपचे नेते नीरज कुमार यांनी सांगितले की, काही दलाल आणि ठेकेदारांच्या कचाट्यातून मुस्लिम समाजाला आता बाहेर आणायचे आहे. नरेंद्र मोदींनी मुस्लिमांसाठी ईदी योजना, उस्ताद योजना चालवली. तीन तलाक सारख्या प्रथा समाप्त केल्या. पण तरीही आम्हाला त्यांची मते मिळाली नाहीत. काही शिक्षित मुस्लिम युवक आणि महिलांनी लोकसभेला मोदींना मतदान केले होते.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com