MP Ajit Gopchade News : मराठवाडा दुष्काळ मुक्तीसाठी नांदेडमध्ये 'आयसीएआर'ची शाखा स्थापन करा!

MP Ajit Gopchade demands establishment of an ICAR branch in Nanded for Marathwada's drought relief in Rajya Sabha. : पाण्याचा तुटवडा,अनियमित पाऊस, हवामान बदलाचे परिणाम, यामुळे येथील पीक उत्पादन घटत असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
MP Ajit Gopchade News
MP Ajit Gopchade NewsSarkarnama
Published on
Updated on

Nanded News : मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी नांदेड जिल्ह्यात भारतीय कृषी संशोधन परिषदेची (ICAR)शाखा स्थापन करावी, अशी मागणी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी आज राज्यसभेत केली. कायम दुष्काळाच्या सावटाखाली वावरणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळ प्रवण भागांपैकी एक असलेला मराठवाडा गेल्या अनेक वर्षांपासून संकटांना तोंड देत आहे.

या भागातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे त्रस्त असल्याचे गोपछडे यांनी यावेळी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. (Nanded) पाण्याचा तुटवडा,अनियमित पाऊस, हवामान बदलाचे परिणाम, यामुळे येथील पीक उत्पादन घटत असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वारंवार निर्माण होणाऱ्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात अस्थिरता येत आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांना आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयापर्यंत जावे लागले आहे.

नांदेडमध्ये आयसीएमआर शाखेची गरज नितांत गरज आहे. आयसीएआर ने दुष्काळ-प्रतिरोधक पिके, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन आणि हवामान-प्रतिरोधक कोरडवाहू शेती तंत्रज्ञानावर संशोधन करण्यास प्राधान्य द्यावे, असे खासदार गोपछडे यांनी स्पष्ट केले. (BJP) यासाठी नांदेड येथे आयसीएआर ची कोरडवाहू कृषी संशोधन संस्था (Dry Land Research Institute) स्थापन करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

MP Ajit Gopchade News
Sitaram Ghandat Join BJP News : सिताराम घनदाट 'मामा' भाजपमध्ये, मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश!

ही शाखा स्थापन झाल्यास, आयसीएआर चे वैज्ञानिक स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी समन्वय साधून शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधू शकतील. तसेच कोरडवाहू शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता येईल. यामुळे मराठवाड्यातील दुष्काळप्रवण भागाचा आर्थिक विकास साधता येईल, असा विश्वास गोपछडे यांनी व्यक्त केला. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दुष्काळमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत आणि आयसीएआर ची शाखा नांदेडमध्ये स्थापन करावी, या मागणीचा पुनरुच्चारही गोपछडे यांनी केला.

MP Ajit Gopchade News
Marathwada Water Crisis : मराठवाड्यात पाणी कपात कशासाठी? जायकवाडीचा पाणी प्रश्न पेटणार!

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 अकोला-संगारेडीच्या कामास मंजुरी दिली गेली आहे, परंतु या कामातील नांदेड-नायगांव-नरसी-देगलूर या 85 किमी रस्त्याचे काम अद्याप प्रलंबित आहे. काही तांत्रिक कारणांमुळे हे काम पूर्ण होऊ शकले नाही. या संदर्भात गोपछडे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तातडीने निधीची तरतुद करून या कामाची पूर्णता करण्याची मागणी केली.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com