Marathwada Floods_Shambhuraj Desai 
मराठवाडा

Marathwada Floods: राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार का? शंभुराज देसाईंनी दिली महत्वाची अपडेट

Marathwada Floods: राज्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये पावसामुळं मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली असून पशुधनालाही मोठा फटका बसला आहे.

Amit Ujagare

Marathwada Floods: राज्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये पावसामुळं मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली असून पशुधनालाही मोठा फटका बसला आहे. गेल्या चार दिवसांनी या भागांमध्ये अक्षरशः दाणादाण उडवून दिली आहे. यापार्श्वभूमीवर विरोधकांकडून सातत्यानं राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली जात आहे. या मागणीवर आता मंत्री शंभुराज देसाई यांनी महत्वाची अपडेट दिली आहे.

माध्यमांशी बोलताना देसाई म्हणाले, पावसामुळं किती क्षेत्रावर नुकसान झालं आहे याची आता आकडेवारी प्राप्त होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, 50 लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र बाधित आहे. काही सुद्धा पीक शिल्लक राहिलेलं नाही अशी परिस्थिती झाली आहे. पाऊस एवढा मोठा होता ज्यामध्ये कॅनॉल देखील फुटले. त्यामुळं अनेक शेतांमध्ये कमरेएवढं पाणी झालं. सर्व महसूल यंत्रणा असो किंवा कृषी यंत्रणेला आम्ही प्रॅक्टिकल पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी जाता येत नाही त्या ठिकाणी ड्रोन पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शंभुराज देसाई म्हणाले, "ओला दुष्काळ आणि सुका दुष्काळ या तांत्रिकबाबीत जाण्यापेक्षा, प्रत्यक्ष शेतकऱ्याला मदत देणं ही आमची जबाबदारी आणि आमचं कर्तव्य आहे. आम्ही नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला मदत देऊ, त्याला मदतीपासून वंचित ठेवणार नाही"

दरम्यान, कालच एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ओला दुष्काळ जाहीर करण्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी असल्याचं म्हटलं होतं. "यामध्ये मुळात ओला दुष्काळ ही शासकीय टर्म नाही तर बोली भाषेत वापरला जाणारा शब्द आहे. शासनाच्या नियमानुसार, सततचा पाऊस असा शब्द प्रयोग केला जातो. पण यासाठीचे निकष अत्यंत कठीण आहेत. यासाठी गेल्या काही वर्षातील अतिवृष्टीच्या डेडाशी तुलना करुन त्यानंतर यंदा किती पाऊस झाला तसंच किती क्षेत्र यामुळं बाधित झालं याचे पंचनामे झाल्यानंतर त्याचं विश्लेषण करुन मग याबाबत निर्णय घेतला जातो"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT