Marathwada Graduate Result News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी अखेर 18 वर्ष प्रतिनिधित्व करणाऱ्या सतीश चव्हाण यांचे संस्थान खालसा करत विजयाचा झेंडा फडकावला आहे. परफेक्ट नियोजनातून करेक्ट कार्यक्रम करण्याची किमया प्रताप पाटलांनी साधली. अर्थात या विजयाचे खरे शिल्पकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हेच ठरले.
तब्बल 45 तास तांत्रिक मतमोजणीमुळे लांबलेल्या निकालाची उत्सुकता अखेर पहाटे पाच वाजता संपली. महाविकास आघाडीच्या प्रतापसिंह पाटील यांनी तब्बल 18 हजार 124 मतांच्या फरकांनी महायुतीच्या सतीश चव्हाण यांचा पराभव केला. मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी 23 ऑक्टोबरला प्रत्यक्ष मतदान आणि 27 रोजी मतमोजणीला सुरुवात झाली.
टपाली मतांमधील 28 मतांची आघाडी सोडली तर महायुतीचे सतीश चव्हाण हे पहिल्या फेरीपासून महाविकास आघाडीच्या प्रतापसिंह पाटील यांच्या विरोधात पिछाडीवरच राहिले. ही पिछाडी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी संपेपर्यंत कायम राहिली. 88 हजार 558 मतांचा कोटा कोणत्याच उमेदवाराला पूर्ण करता आला नाही. शेवटी 41 उमेदवारांपैकी सर्वात कमी मतं असलेल्या उमेदवारांना बाद करत त्यांच्या दुसऱ्या पसंतीची मते हस्तांतरित करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालली.
अखेर सर्वाधिक मते मिळवणाऱ्या प्रतापसिंह पाटील यांना विजयी घोषित करून पहाटे पाच वाजता प्रमाणपत्र देण्यात आले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या राजकीय रणांगणात डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी बाजी मारत महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना धक्का दिला. तब्बल 18 हजार 124 मतांच्या फरकाने विजय मिळवत पाटील यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध केले.
प्रतापसिंह पाटील यांना 85 हजार 876, तर सतीश चव्हाण यांना 67 हजार 752 मते मिळाली. तब्बल ४५ तासांहून अधिक काळ चाललेल्या मतमोजणीनंतर गुरुवारी पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी पाटील यांना विजयी घोषित केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.