BJP Defeat : भाजपचा टांगा पलटी, नागपूरच्या विजयानंतर अभिजीत वंजारी कराळे मास्तरांना म्हणाले, 'ते आमचे...'

Abhijit Vanjari on Nitesh Karale : अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांनी 24 हजाराहून अधिक मते घेतल्याने ते काँग्रेस उमेदवार पराभूत होईल, अशी शक्यता होती. मात्र, पसंती क्रमांक दोनच्या मतमोजणीनंतर काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी झाले.
Abhijit Vanjari on Nitesh Karale
Abhijit Vanjari on Nitesh Karale sarkarnama
Published on: 
Updated on: 

Abhijit Vanjari News : नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी विजय मिळविला. त्यांना प्रथम व द्वितीय पसंतीक्रमाची एकूण ६७ हजार २३१ मते मिळाली. तर त्यांचे नजिकचे प्रतिस्पर्धी भाजपचे सुधाकर कोहळे यांना ६३ हजार ९६० मते मिळाली. 

वंजारी हे चार हजार मतांनी पिछाडीवर होते. महाविकास आघाडीतील बंडखोर, अपक्ष उमेदवार नितेश कराळे मास्तर यांना तब्बल 25 हजार मतं मिळाली होती. त्यामुळे कराळे मास्तर यांच्यामुळे वंजारी पराभूत होणार अशी चर्चा होती. मात्र, कराळे यांच्या मतपत्रिकेतील पसंती क्रमांक दोनची सर्वाधिक मते ही वंजारी यांना मिळाली. आणि त्यांनी सुधाकर कोहळे यांचा पराभव केला.

या विजयानंतर बोलताना अभिजीत वंजारी यांना कराळे यांच्या विषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, नितेश कराळे हा आमचा मित्र, लहान भाऊ आहे. त्यांना मिळालेली दुसऱ्या पसंतीची मते ही आमच्या रणनीतीचा भाग आहेत. मिळालेली २५ हजार मते कुणाचीही असली तरी विजय आमचा झाला हे आम्हाला माहिती आहे. मी प्रचार दरम्यान सांगत होतो की, ही निवडणूक प्रचारापेक्षा रणनीतीची निवडणूक आहे. कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते.ती म्हण आज खरी ठरली आहे. तसेच आमचा विजय झाला आहे.

शिक्षक संघटना आमच्या पाठीशी

अभिजीत वंजारी म्हणाले की, शिक्षक संघटना माझ्या पाठीशी होत्या. पदवीधरांसाठी मी गेल्या सहा वर्षांमध्ये जे काम काम केले त्याची पोचपावती मला या विजयाच्या निमित्ताने मिळाली आहे. दुसऱ्या पसंतीच्या मतांनी ते विजयी झाले त्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, जो जित वही सिकंदर, भाजप ज्या प्रकारचे राजकारण करते त्याला मतदारांनी दिलेले हे उत्तर आहे.

Abhijit Vanjari on Nitesh Karale
MLC Winners List : शिक्षक, पदवीधरमधून कोण विजयी, वाचा संपूर्ण यादी! नागपूरमध्ये ट्विस्ट

मतांचा कोटा पूर्ण केला नाही...

पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक ७५ हजार ४३८ मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेनुसार द्वितीय पसंतीक्रमाची बाद फेरी घेण्यात आली. पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये १ लाख ६५ हजार ९०६ मतांपैकी १५ हजार ३२ मते अवैध ठरली. तर १ लाख ५० हजार ८७४ मते वैध ठरली.

द्वितीय पसंतीच्या बाद फेऱ्यामध्येही कुठल्याही उमेदवाराला निर्धारित कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे पहिल्या व द्वितीय पसंतीक्रमाच्या बाद फेरी मिळून सर्वाधिक ६७ हजार २३१ मते घेणाऱ्या अभिजित वंजारी यांना विजयी घोषीत करण्यात आले.

Abhijit Vanjari on Nitesh Karale
MLC Election Results : PM मोदींच्या वाराणसी मतदारसंघातच भाजपला दोन जबर धक्के! विधानपरिषदेची शिक्षक अन् पदवीधरची जागा समाजवादी पक्षाच्या खिशात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com