Latur DCC Bank : लातूर जिल्हा बँकेत सहकाराचा वेगळाच पॅटर्न; देशमुख-पवार एकत्र, भाजप आमदारांच्या सौभाग्यवतीही बिनविरोध!

Latur DCC Bank Politics : जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणून लढा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, असे भाजपचे नेते सतत सांगत आहेत. त्यात पहिल्यांदा सहकारमंत्री बाबासाहेब पाटील बाजू सरकले व देशमुखांसोबत गेले. त्यात आता भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी बिनविरोध निवडून आल्यात जमा आहेत.
Latur DCC Bank Election
Latur DCC Bank ElectionSarakrnama
Published on: 
Updated on: 

Marathwada Politics : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महायुतीचे सर्व नेते एकत्रित लढणार आहेत, असे वारंवार भाजपचे नेते माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर सांगत असतानाच बुधवारी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी शोभा पवार या बिनविरोध निवडून आल्या आहेत. माजी मंत्री दिलीपराव देशमुख आणि आमदार अभिमन्यू पवार यांनी संभाजी पाटील निलंगेकर यांना दिलेली ही चपराक मानली जात आहे. यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकाराचा नवाच पॅटर्न दिसून आला आहे.

जिल्हा बँक निवडणुकीत पहिल्यापासूनच महायुतीला धक्के बसत आहेत. या निवडणुकीत सहकारमंत्री बाबासाहेब पाटील हे पहिल्यापासूनच माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्यासोबत आहेत. ४० वर्षांपासून ते दोघे बँकेवर एकत्र आहेत. त्यांच्या नेतृत्वाच बँकेची वाटचाल सुरू आहे. या निवडणुकीत पहिल्यापासून भाजपचे नेते आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सहकारमंत्री पाटील यांना लक्ष्य केले होते. पाटील यांनीदेखील त्यांना जशास तसे उत्तर दिले.

शेवटी पाटील हे देशमुखांसोबत गेल्याने महायुतीला पहिला धक्का बसला होता. त्यानंतरही महायुतीतील आमदार अभिमन्यू पवार, रमेश कराड, संजय बनसोडे हे आमच्यासोबत आहेत, असे निलंगेकर वारंवार सांगत होते. आता पवारांनीदेखील त्यांची साथ सोडल्याने महायुतीला हा दुसरा धक्का बसला आहे.

देशमुख-पवार एकत्र

या निवडणुकीत औसा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून आमदार पवार यांनी पत्नी शोभा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पवार व देशमुख यांचे पहिल्यापासूनच सख्य राहिलेले आहे. एकमेकांना पूरक राजकारण केले जात असल्याचे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे शोभा पवार यांना देशमुखच बिनविरोध काढणार, याची चर्चा सुरवातीपासूनच राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यावर बुधवारी शिक्कामोर्तब झाले. पवार यांच्यासमोरील देशमुख समर्थकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शोभा पवार या बिनविरोध आल्यात जमा आहेत. आता त्यांनी महिला प्रतिनिधी संघातील आपला अर्ज मागे घेतला आहे.

Latur DCC Bank Election
Torrent Power Project : ‘जंगलाच्या अंतिम संस्काराला आलोय’, राज ठाकरेंचा कर्जत प्रकल्पावरून सरकारवर हल्लाबोल; पंतप्रधानांसह अमित शहांवर निशाणा

निलंगा मतदारसंघावर परिणाम

निलंगा विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून अरविंद पाटील निलंगेकर व त्यांच्या काकू संगीता अशोक पाटील निलंगेकर यांच्यात सामना रंगणार आहे. अशोक पाटील निलंगेकर गेली अनेक वर्षे जिल्हा बँकेवर होते. पण यावर्षी दहा वर्षांच्या अटीमुळे त्यांचा अर्ज बाद झाला. मात्र, त्यांच्या पत्नी संगीता पाटील निलंगेकर या रिंगणात आहेत. आता शोभा पवार बिनविरोध आल्याने निलंगा मतदारसंघावर अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे.

निलंगा मतदारसंघातील कासार सिरसी व कासार बालकुंदा हे दोन गट हे औसा विधानसभा मतदार संघात येतात. तेथे आमदार अभिमन्यू पवार यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे हे या गटातील मतदार आमदार पवार हे देशमुखांच्या पारड्यात टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना अरविंद पाटील निलंगेकर यांच्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत.

Latur DCC Bank Election
Congress victory : वाराणसी, नागपूरमध्ये भाजपला धक्के; मोदींच्या मतदारसंघात सपाचा विजय, संघाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची बाजी!

मुख्यमंत्र्यांचाच हिरवा कंदील?

जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणून लढा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, असे भाजपचे नेते सतत सांगत आहेत. त्यात पहिल्यांदा सहकारमंत्री बाबासाहेब पाटील बाजू सरकले व देशमुखांसोबत गेले. त्यात आता भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी बिनविरोध निवडून आल्यात जमा आहेत. देशमुखांमुळेच त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. आमदार पवार हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आहेत. त्यामुळे फडणवीस यांना या संदर्भात माहिती सांगितली नसेल, असे म्हणणे धाडसाचे ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांनीच हिरवा कंदील दाखवल्यानंतर आमदार पवार यांनी देशमुखांसोबत जाण्याचे पाऊल उचलले असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता रंगत येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com