South India Exit Poll Sarkarnama
मराठवाडा

Local body elections: झेडपी निवडणुकीत मराठवाड्यात पुन्हा महायुतीची सरशी? कोठे, कोणाची सत्ता? काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे

Zilla Parishad elections News : मतदानप्रक्रिया पार पडताच आता एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. या आकडेवारीनुसार पुन्हा एकदा मराठवाड्यात महायुतीचे वर्चस्व एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार दिसत आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीसाठी शनिवारी मतदान पार पडले. प्रचार काळात सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. मतदानप्रक्रिया पार पडताच आता एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. या आकडेवारीनुसार पुन्हा एकदा मराठवाड्यात महायुतीचे वर्चस्व एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार दिसत आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पाठींब्यावर सत्ता स्थापन करू शकते. तर धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पाठींब्यावर सत्ता येऊ शकते. लातूरमध्ये महायुतीमधील तीन मित्र पक्ष एकत्रित येऊन सत्ता स्थापन करू शकतात. तर परभणीत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस असे महायुतीमधील तीन अथवा दोन मित्र पक्ष एकत्रित येऊन सत्ता स्थापन करू शकतात, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ६३ गट आहेत. त्यामध्ये भाजपला (BJP) २६, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला २०, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ८ जागा मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ६, काँग्रेसला १ तर इतरांना २ जागी विजय मिळू शकतो, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत भाजप मोठा पक्ष ठरू शकतो. बहुमतासाठी ३२ जागांची गरज आहे. या ठिकाणी शिंदे यांच्या शिवसेनेच्या पाठींब्यावर भाजपची सत्ता येऊ शकते.

धाराशिव जिल्ह्यात एकूण ५५ गट आहेत. याठिकाणी भाजपला २२, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (Shivsena) ११, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला १४, काँग्रेसला ३, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४ तर इतराना ४ जागा मिळू शकतात, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. याठिकाणी बहुमतासाठी २८ जागांची गरज आहे. भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मदतीने सत्तेत येऊ शकतो.

लातूर जिल्ह्यात एकूण ५९ गट आहेत. त्यापैकी भाजपला २०, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ३, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ८, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला १, काँग्रेसला २१, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २, इतरांना १ जागा मिळू शकतात असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. याठिकाणी बहुमतासाठी ३० जागांची गरज आहे. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस असे महायुतीमधील तीन मित्र पक्ष एकत्रित येऊन सत्ता स्थापन करू शकतात.

परभणी जिल्ह्यात एकूण ५६ गट आहेत. त्यापैकी भाजपला २१, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ८, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १४, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ४, काँग्रेसला ५, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागा मिळू शकतात असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. याठिकाणी बहुमतासाठी २९ जागांची गरज आहे. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस असे महायुतीमधील तीन अथवा दोन मित्र पक्ष एकत्रित येऊन सत्ता स्थापन करू शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT