ZP-PC Upcoming Election News : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात गट आणि गणांची प्रारूपचना सोमवारी जाहीर झाली. त्यात नांदेड जिल्ह्यात दोन तर छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि लातूरला प्रत्येकी एका गटाची भर पडली. मराठवाड्यात सहा गट आणि बारा गण वाढले आहेत. 2011 च्या लोकसंख्येनुसार नवी रचना करण्यात आली आहे.
कोरोना काळापासून राज्यातील बहुमतांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) रखडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने या निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्या दृष्टीने प्रभाग रचना, जिल्हा परिषदेचे गट आणि गण यांची प्रारुपचना जाहीर करण्याच्या कामाला वेग आला आहे. काल मराठवाड्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीचे गट आणि गण जाहीर झाले.
त्यानुसार छत्रपती संभाजीनगर मध्ये सिल्लोड तालुक्यातील अंभई हा नवा गट तयार झाला आहे. त्यात अभई व केळगाव असे दोन गण असतील. हा गट शिवसेनेचे विद्यमान आमदार तथा अब्दुल सत्तार यांच्या मुलासाठी वाढवला गेल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे. (Marathwada) मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात एक गट आणि दोन गणांची भर पडली असून केज तालुक्यात येवता हा गट आणि येवता व दहिफळ वडमाऊली हे दोन पंचायत समिती गण वाढले आहेत. या बदलामुळे आता जिल्हा परिषदेत 61 तर पंचायत समितीत 122 सदस्य निवडून जाणार आहेत
जालन्यात हिलस हा नवा गट तयार झाला आहे. त्यामळे आता जिल्हा परिषदेच्या 57 गटांमध्ये आणि 114 पंचायत समिती गणनांमध्ये निवडणूक होणार आहे. जालन्या प्रमाणेच लातूर जिल्हा परिषद गटांची संख्या एकाने वाढली असून दोन गण वाढणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांची संख्या आता 59 होईल पंचायत समितीच्या 118 जागांसाठी इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
धाराशिव- परभणीत जुनी संख्या
मराठवाड्यातील आठ पैकी नांदेड, संभाजीनगर, बीड, जालना आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी एका गटाची भर पडली आहे. तर परभणी आणि धाराशिवमध्ये गेल्या वेळचीच संख्या कायम आहे. धाराशिव मध्ये 55 गट आणि 110 गणांची संख्या कायम ठेवण्यात आली आहे. तर परभणी मध्ये 37 गट तयार करण्यात आले आहे हिंगोलीत भवन जिल्हा परिषद गटांची पंचायत समितीच्या 104 जणांची प्रारूप घटना जाहीर करण्यात आली आहे. तर नांदेड जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रभागनिहाय गट रचनेचे अधिसूचना 14 जुलै पर्यंत प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यावेळी नांदेड मधील धनेगाव व अर्धापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचा गट वाढला आहे. तसेच तालुक्यांमध्ये प्रत्येकी दोन गण वाढले आहेत. 2017 च्या निवडणुकीत 63 गट होते मात्र या निवडणुकीत दोन गट व चार गण वाढले आहेत. नांदेड, अर्धापुर तालुक्यात प्रत्येकी एका गटाची भर पडणार आहे. यावेळी मुखेड तालुक्यातून सर्वाधिक सात जिल्हा परिषद सदस्य असतील तर माहूर, हिमायतनगर, मुदखेड, डोंगरी धर्माबाद तालुक्यातून सर्वात कमी प्रत्येकी दोन सदस्य सभागृहात येतील.
दरम्यान प्रारूप गट रचना करताना भौगोलिक गोष्टी विचारात घेतल्या आहेत. ग्रामपंचायतीची फोड होऊ नये, दोन गट गट विभागला जाऊ नये अशी रचना करण्यात आली आहे. विभाजन होताना नदी, नाले, रस्ते यांचा समावेश असावा, अंदाजे 35 ते 40 हजारापर्यंत लोकसंख्या असलेला एक प्रभाग आहे. 2011 च्या लोकसंख्येनुसार ही प्रक्रिया करण्यात आली आहे. आता 12 जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती व सूचना सादर करता येणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.