Massajog sarpanch by-election campaign as Ashwini Deshmukh and Swarupanand Deshmukh Sarkarnama
मराठवाडा

Massajog Sarpanch Election: तळपत्या उन्हातही मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 84 टक्के मतदान; स्वरुपानंद की अश्विनी देशमुख, काही तासांतच निकाल लागणार

Santosh Deshmukh Case : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या झाल्याने या रिक्त पदासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्‍विनी देशमुख तसेच स्वरुपानंद देशमुख यांच्यात लढत झाली.

Jagdish Pansare

Beed Politics News : मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत आज 2084 पैकी 1744 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, दुपारी मतदान केंद्राबाहेर दोन्ही गट समोरासमोर आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती आटोक्यात आणली शिवाय अतिरिक्त बंदोबस्त वाढवून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडली.

सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख विरुद्ध स्वरुपानंद देशमुख यांच्यात सरपंच पदासाठी थेट लढत झाली. अश्विनी देशमुख यांनी दिवंगत संतोष देशमुख यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी साथ देण्याचे आवाहन केले होते. तर स्वरुपानंद देशमुख यांनी त्यांच्या कार्यकाळात गावासाठी केलेल्या कामांच्या जोरावर गावकऱ्यांकडे मतांचे दान मागितले होते.

सहानुभूती, विकासाचा मुद्दा या भोवती मस्साजोगची पोटनिवडणुक फिरली. उद्या, मतमोजणीनंतर काही तासातच निकाल जाहीर होणार आहे. या पोटनिवडणुकीकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

दोन्ही देशमुखांच्या प्रतिष्ठेच्या या लढाईत 2084 मतदारांपैकी 1744 मतदारांनी तळपत्या उन्हात मतदानाचा हक्क बजावला. 83.69 टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती, प्रभारी तहसिलदार अशोक भंडारे यांनी दिली.

दरम्यान, मतदान केंद्राबाहेर दोन गटांत कुरबुरीचा प्रकार घडल्याने राखीव पोलिसांचा फौजफाटा मागवण्यात आला. दोन्ही गटांना समज दिल्यानंतर वाद शमला. याबाबत कुठलीही नोंद झाली नाही. जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज), सिरसाळा (ता. परळी) तसेच अन्य 10 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह 19 सदस्यांच्या निवडीसाठीही मतदान झाले.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या झाल्याने या रिक्त पदासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्‍विनी देशमुख तसेच स्वरुपानंद देशमुख यांच्यात लढत झाली. अश्‍विनी देशमुख यांच्यासाठी त्यांची मुगली वैभवी व मुलगा विराज यांनीही घरभेटी देत मतदान मागितले. दिवंगत देशमुख यांची सहानुभूती तसेच त्यांनी केलेल्या विकास कामांचाही उहापोह निवडणुकीत झाला.

तर, स्वरुपानंद देशमुख यांनीही त्यांच्या काळात केलेल्या कामांचा उल्लेख करत आपल्यावर विश्वास दाखवण्याचे आवाहन मतदारांना केले. देशमुख मागच्या काही महिन्यांपासून निवडणुकीच्या दृष्टीने मतदारांच्या संपर्कात होते. आता कौल कोणाच्या पारड्यात याचा फैसला उद्या 11 वाजेपर्यंत होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या सिरसाळा येथे सायंकाळी सात वाजेपर्यंतही मतदारांच्या रांगा होत्या. याचबरोबर सौंदना, धसवाडी - वांगदरवाडी, बोरखेड, पाली, कुसळंब, जळगव्हाण, मरळवाडी, काडीवडगाव, मिरकळा, सावरगाव घाट या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. बुधवारी संबंधित तालुक्यांच्या ठिकाणी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT