Massajog Sarpanch Election News : संतोष देशमुख यांच्या मस्साजोगचे नेतृत्व कोण करणार? 2280 मतदारांच्या हाती सत्तेची चावी, उद्या मतदान

Political News : मस्साजोगच्या सरपंचाची निवड बिनविरोध व्हावी यासाठी गावकरी आणि बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले होते. परंतु यावर एकमत होऊ शकले नाही,
Santosh Deshmukh News Beed
Santosh Deshmukh News Beedsarkarnama
Published on
Updated on

Beed Politics News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे खंडणी प्रकरणातून अपहरण आणि त्यानंतर झालेल्या निर्घृण हत्येने महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतर दीड वर्षांनी मस्साजोगच्या सरपंच पदासाठी उद्या (ता.28) रोजी मतदान होत आहे. 2280 मतदार या गावचा सरपंच ठरवणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख विरुद्ध स्वरुपानंद देशमुख यांच्या थेट लढत होत आहे.

मस्साजोगच्या सरपंचाची निवड बिनविरोध व्हावी यासाठी गावकरी आणि बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले होते. परंतु यावर एकमत होऊ शकले नाही, शिवाय गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य सरपंच स्वरुपानंद देशमुख यांनी निवडणूक लढवण्यावर ठाम राहत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला. त्यानंतर आता मंगळवारी सरपंच पदासाठी मतदान होणार आहे.

Santosh Deshmukh News Beed
Massajog Gram Panchayat Election : मस्साजोगच्या निवडणुकीत 'बिनविरोध'ची आशा मावळली; सरपंच पदासाठी दोन देशमुख भिडणार

निवडणूक जाहीर होऊन प्रचार आणि उद्याच्या मतदाना दरम्यान बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. धनंजय देशमुख यांनी आमच्यासाठी निवडणुकीपेक्षा संतोषभैय्या देशमुख यांना व गावकऱ्यांना न्याय मिळावा हे महत्वाचे असल्याचे सांगत त्याच कारणामुळे आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो नाही. अन्यथा मीच उमेदवार राहिलो असतो असे सांगितले. संतोष देशमुख यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी अश्विनी देशमुख यांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले होते.

Santosh Deshmukh News Beed
Massajog Gram Panchayat Election: बिनविरोध निवडीचा दावा, पण मस्साजोगच्या सरपंच पदासाठी पाच जणांनी भरले अर्ज!

तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवत असलेले स्वरुपानंद देशमुख यांनी साडे तेरा वर्ष ग्रामंपचायत तुमच्या ताब्यात होती, सरपंच तुमचा होता, मग अशी कोणती कामे आहेत, जी तुम्हाला साडे तेरा वर्षात करता आली नाहीत, ती या 13 महिन्यात करायची आहे, ते समोरासमोर येऊन सांगा, असे आव्हान दिले होते. यावरून राजकारण तापलेले असतानाच बीड कारागृहातील कथित आॅडीओ क्लीप आणि त्याचा थेट संबंध मस्साजोगच्या निवडणुकीशी जोडल्या गेल्याने मोठा गदारोळ सुरू झाला.

Santosh Deshmukh News Beed
Massajog Gram Panchayat Election: बिनविरोध निवडीचा दावा, पण मस्साजोगच्या सरपंच पदासाठी पाच जणांनी भरले अर्ज!

वाल्मिक कराड यांची बदनामी करण्यासाठी ती आॅडिओ क्लीप दबाव आणून धनंजय देशमुख यांचे साडू खिंडकर यांच्या सांगण्यावरून तयार करण्यात आल्याचा आरोप बीड कारागृहातील कैदी अझहर पठाण याने केला होता. या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या मस्साजोगच्या सरपंच पदाच्या मतदानाकडे राज्याचे लक्ष असणार आहे. मतदार अश्विनी देशमुख व त्यांच्या कुटुंबियावर पुन्हा विश्वास दाखवणार की मग स्वरुपानंद देशमुख यांच्या आवाहनाला प्रतिसाद देणार? हे 29 मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.

Santosh Deshmukh News Beed
Massajog Gram Panchayat Election: बिनविरोध निवडीचा दावा, पण मस्साजोगच्या सरपंच पदासाठी पाच जणांनी भरले अर्ज!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com