BJP Vidhan Paridhad: बावनकुळेंनी इचलकरंजीत येऊन शब्द दिला, तरी भाजपची हाळवणकरांना पुन्हा टांग, आमदारकीचं स्वप्नं भंगलं

MLC Election News: विधानसभा निवडणुकीनंतर सुरेश हाळवणकर यांना विधान परिषदेसाठी संधी दिली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. माजी खासदार संजयकाका पाटील यांना देखील पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.
bjp Suresh halvankar sanjay kaka patil .jpg
bjp Suresh halvankar sanjay kaka patil .jpgSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: राज्यात होणाऱ्या विधान परिषदेसाठी भाजपकडून आज पाच उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बहुप्रतिक्षित विधानपरिषदेसाठी इच्छुक असलेल्या माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या पदरी निराशाच आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सुरेश हाळवणकर यांना विधान परिषदेसाठी संधी दिली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. माजी खासदार संजयकाका पाटील यांना देखील पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर इचलकरंजीचे तत्कालीन अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपशी संपर्क वाढला. 2024 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, वर्षानुवर्ष इचलकरंजी मध्ये भाजपचा गड सांभाळलेले माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि त्यांचा गट आवाडे यांच्या पक्षप्रवेशामुळे नाराज झाला होता.

तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इचलकरंजी मध्ये येऊन हळवणकर यांची नाराजी दूर केली जाईल. त्यांना विधान परिषदेवर घेतले जाईल असे वचन कार्यकर्त्यांना दिले होते.

त्यानंतर माजी आमदार सुरेश हळवणकर यांना विधान परिषदेवर घेण्याची चर्चा ही रंगली होती. त्यानंतर राज्यात विधान परिषदेसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून पाच उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. भाजपकडून विधानसभा निवडणुकीत अनेकांना शब्द देण्यात आले होते. मात्र हे शब्दच भाजपने फिरवले आहेत.

bjp Suresh halvankar sanjay kaka patil .jpg
BJP MLC Election: मोठी बातमी: भाजपचं विधान परिषदेसाठी धक्कातंत्र,अंदाज चुकवला; उमेदवारांची यादी अखेर जाहीर, कुणाला संधी, कुणाचा पत्ता कट?

या उमेदवारांच्या ठिकाणी सर्वच तगड्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने भाजपच्या जुन्या आणि जाणत्या कार्यकर्त्यांना नेत्यांना धक्का बसला आहे. सुरेश हळवणकर यांचे नाव आघाडीवर असताना भाजपने नवे चेहरे देत प्रस्थापित माजी पदाधिकाऱ्यांना धक्का दिला आहे. त्यामुळे हळवणकर गटामध्ये पुन्हा एकदा निराशा झाली आहे.

तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यामध्ये देखील तीच परिस्थिती आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पराभूत झालेले माजी खासदार संजय काका पाटील विधानसभा निवडणुकीत भाजप पासून दूर गेले. राष्ट्रवादी काँग्रेस मधून निवडणूक लढवलेले संजय काका पाटील हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा भाजप जवळ आले. त्यांना देखील विधान परिषदेवर घेण्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.

bjp Suresh halvankar sanjay kaka patil .jpg
BJP Candidate List: विधानसभेला माघार, फडणवीसांची मध्यस्थी, दिल्लीत शहांची हमी; 'असं' खेचून आणलं कोपरगावच्या विवेक कोल्हेंनी विधान परिषदेचं तिकीट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com