Ashvini deshmukh, swrupanand deshmukh  Sarkarnama
मराठवाडा

Massajog Sarpanch Election : 'मस्साजोग'च्या सरपंचपदाचा गुलाल कोण उधळणार, स्वरुपानंद की अश्विनी देशमुख? सव्वा वर्षानंतर गावात पहिल्यांदाच मतदान, दोन गटांत वादाचा भडका

village election Maharashtra News : मस्साजोगच्या सरपंच पदासाठी मंगळवारी सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली. मतदारांमध्ये उत्साह पहायला मिळाला, पण दुपारी गावातील दोन गट एकमेकांसमोर येऊन वाद झाल्याने काही काळ मोठा गोंधळ उडाला होता.

Jagdish Pansare

Beed Politics News : दिवंगत संतोष देशमुख यांची खंडणी प्रकरणातून अपहरण आणि हत्या प्रकरणानंतर दीड वर्षांनी लागलेल्या मस्साजोगच्या सरपंच पदासाठी मंगळवारी सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली. मतदारांमध्ये उत्साह पहायला मिळाला, पण दुपारी गावातील दोन गट एकमेकांसमोर येऊन वाद झाल्याने काही काळ मोठा गोंधळ उडाला होता. काही अनुचित प्रकार घडण्याआधीच पोलीसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाला दूर केले.

मतदान केंद्रावर मतदान बंद पडल्याच्या अफवेने काही काळ वातावरण तापले होते. परंतु पोलीसांनी तात्काळ दखल घेत असा कुठलाही प्रकार घडलेला नाही, मतदान प्रक्रिया व्यवस्थित सुरू असल्याचे सांगितले. दोन गट एकमेकांसमोर आल्याने पोलीसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता. मस्साजोगचा नवा सरपंच स्वरुपानंद देशमुख होणार की अश्विनी देशमुख? याचा निकाल उद्या मतमोजणीनंतर लागणार आहे.

गावकरी आम्हालाच साथ देतील, संतोष देशमुख यांनी गावासाठी खूप काही केले आहे, त्याचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी मतदार आमच्याच बाजूने कौल देतील असा विश्वास अश्विनी देशमुख यांनी व्यक्त केला. तर ही निवडणूक आमच्यावर लादण्यात आली, माझी निवडणूक लढण्याची इच्छा नव्हती. जेवढा संघर्ष मला संतोष देशमुख असताना करावा लागला नाही, तेवढा आता करावा लागत आहे, असे म्हणत मतदारच याचे चोख उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया अश्विनी देशमुख यांनी दिली.

तर, संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या कुटुंबाबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. न्यायालयीन प्रकरणात आमचा त्यांना संपूर्ण पाठिंबा आहे, पण राजकारणात नाही, या भूमिकेचा पुनरुच्चार स्वरुपानंद देशमुख यांनी केला. मी ग्रामपंचायतीमध्ये अनेक वर्ष काम केले आहे, या काळात अनेक योजना राबवल्या. माझे काम गावातल्या लोकांसमोर आहे. त्यामुळे मला खात्री आहे, की ते मला संधी देतील, असा विश्वास संतोष देशमुख यांच्याविरोधात गेल्यावेळी 9 मतांनी पराभूत झालेल्या स्वरुपानंद देशमुख यांनी व्यक्त केला.

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी मंगळवारी पोटनिवडणूक पार पडत आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख या दोघांमध्ये थेट लढत होते आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा देशमुख कुटुंबीयांनी व्यक्त केली होती. मात्र मागच्या वेळी केवळ 9 मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांनी यावेळी आपला अर्ज कायम ठेवल्याने या निवडणुकीसाठी मतदान होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT