Massajog Election: "मलाही सासऱ्यांच स्वप्न पूर्ण करायचंय"; बारामतीनंतर मस्साजोगच्या उमेदवाराची भूमिका; निवडणूकही होणार नाही बिनविरोध

Massajog Election: अत्यंत अमानुषपणे झालेल्या संतोष देशमुख हत्याकांडांनंतर पहिल्यांदाच मस्साजोग ग्रामपंचायत निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख या निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.
Sanjeevani Deshmukh_Ashwini Santosh Deshmukh
Sanjeevani Deshmukh_Ashwini Santosh Deshmukh
Published on
Updated on

Massajog Election: करुणा मुंडेंमुळं बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही. बारामतीतून निवडणूक लढवण्याची आपल्या सासऱ्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत आहोत अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आता बीडच्या मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संजीवनी देशमुख यांनी देखील आपल्याला सासऱ्यांचं स्वप्न पूर्ण करायचं असल्याचं सांगत निवडणूक बिनविरोध करण्यास नकार दिला आहे. तसंच या निवडणुकीसंदर्भात त्यांनी अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत.

Sanjeevani Deshmukh_Ashwini Santosh Deshmukh
Joke on DCM: उपमुख्यमंत्र्यांवर केला विनोद! प्रसिद्ध कॉमेडियनच्या अटकेसाठी पोलीस हैद्राबादेतून पोहोचले प्रयागराजमध्ये; काय आहे प्रकरण?

अत्यंत अमानुषपणे झालेल्या संतोष देशमुख हत्याकांडांनंतर पहिल्यांदाच मस्साजोग ग्रामपंचायत निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख या निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. पण आता ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, असं दिसंतय कारण राष्ट्रवादीच्या उमेदवार संजीवनी देशमुख या देखील ही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. ही निवडणूक लढवण्यामागचं कारणंही त्यांनी स्पष्ट केलं असून आपल्या सासऱ्यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

वर्षभर निवडणूक का रखडली?

मस्साजोग सरपंचपदाची निवडणूक वर्षभर का रखडली? या मागे काय डाव होता? असा सवाल संजीवनी देशमुख यांनी उपस्थित केला आहे. संतोष देशमुख यांच्यासोबत मी दहा वर्षे काम केलं आहे. त्यापूर्वी गावात जिल्हा परिषदेची शाळा, विविध विकासकामे माझ्या सासऱ्यांनी केली आहेत. अजूनही त्यांना अपेक्षित काही कामे पूर्ण झालेली नाहीत, त्यांनी गावाच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न मला पूर्ण करायचे आहे. त्यामुळं मी निवडणुकीतून माघार घेणार नाही, असं स्पष्ट करत संजीवनी देशमुख यांनी निवडणूक लढण्यावर आपण ठाम असल्याचे सांगितलं.

Sanjeevani Deshmukh_Ashwini Santosh Deshmukh
Maval APMC News: आमदार सुनील शेळके यांची राजकीय खेळी यशस्वी! मावळ बाजार समिती बरखास्त

गावकऱ्यांनी कोणाशी केली चर्चा?

गावात सुमारे १००० इतकं फक्त महिलांचं मतदान आहे. या महिलांची मतं कोणी जाणून घेतली का? असा सवाल करताना याचं उत्तर नाही असं आहे. मग निवडणूक बिनविरोध करायचा निर्णय कोणत्या लोकांनी घेतला? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. मी संतोष देशमुख यांच्यासोबत काम केलेलं आहे. त्यांच्या प्रत्येक निर्णयात मी त्यांना साथ दिलेली आहे. मग बिनविरोध सरपंच निवडायचा असेल तर मला संधी दिली पाहिजे, अशी अपेक्षाही संजीवनी देशमुख यांनी व्यक्त केली. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी सगळं गावं उभ राहिलं. आश्विनी वहिनीचं दु:ख मी समजू शकते. पण भावनिक विषय आणि राजकारण हे दोन वेगळे विषय आहे. अश्विनी देशमुख यांनीही दहा वर्षे गावाचा कारभार पाहिलेला आहे. आता त्यांनी संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा कशी होईल? यासाठीचा न्यायालयीन लढा लढला पाहिजे.

राजकारणात आता त्यांना एवढे मोठे दु:ख घेऊन काम करता येणार नाही. पूर्वीसारखं त्या आता गावाच्या विकासकामासाठी वेळ देऊ शकतील असं वाटत नाही. त्यामुळं मला संधी मिळाली पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. संतोष अण्णाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही निवडणूक लढवतोयं असं सांगितलं जातं. मी त्याचे स्वप्न पूर्ण करण्यात कुठेही कमी पडणार नाही, असा शब्द देते, तुम्ही मला सहकार्य करा, असं आवाहनही संजीवनी देशमुख यांनी गावकऱ्यांना केलं आहे.

Sanjeevani Deshmukh_Ashwini Santosh Deshmukh
Ambedkar Jayanti Clash Case : बाबासाहेबांच्या जयंती उत्सवात रक्तरंजित थरार! जोरदार हाणामारी, धक्काबुकी अन् दगडफेक; बंदोबस्तावरील पोलिसावर हल्ला

मस्साजोगमध्ये सरपंचपदासाठी अश्विनी संतोष देशमुख यांच्यासह पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. येत्या १७ तारखेला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. तोपर्यंत आणखी काय घडामोडी घडतात? निवडणूक होणार की बिनविरोध होणार? याचा फैसला होणार आहे. तुर्तास राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजीवनी देशमुख आणि स्वरुपानंद देशमुख यांनी माघार न घेण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com