Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency : इम्तियाज जलील यांना छत्रपती संभाजी नगरमधून एमआयएमने दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. या पक्षाकडे त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. गेल्या निवडणुकीत ज्या शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमने 4492 मतांनी पराभव केला होता, तेच खैरे पुन्हा मैदानात आहेत. खैरेंनी प्रचारात आघाडी घेतली असली तर एमआयएमचा प्रचार अद्याप सुरू झालेला नाही.
रमजान असल्यामुळे इम्तियाज जलील(Imtiaz Jalil) यांनी फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून गेला पाच वर्षात त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा आणि संसदेत आवाज उठवलेल्या प्रश्नाची आठवण करून दिली आहे. आरक्षण, रस्ते विकास, पाणी, भ्रष्टाचार, मुस्लिमांचे प्रश्न यासह विविध विषयावर वाचा फोडणारे संसदेतील व्हिडिओ खासदार म्हणून केलेली कामगिरी म्हणून व्हायरल केले आहेत. उद्या रमजान ईद झाल्यानंतर इम्तियाज जलील व त्यांच्या एमआयएम पक्ष प्रचारासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मागच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या चमत्काराची इम्तियाज यांना पुन्हा आशा आहे. परंतु परत परत घडत नसतो तो चमत्कार असतो असे म्हटले जाते. त्याप्रमाणे एमआयएमला यावेळी निवडणूक सोपी नाही एवढे मात्र निश्चित. महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला असला तरी राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या उमेदवाराची प्रतिक्षा सर्वसामान्यांप्रमाणेच राजकीय पक्षांना आहे. गेल्या निवडणुकीत लढलेले तीनही उमेदवार पुन्हा लढण्यासाठी सज्ज आहेत.
चंद्रकांत खैरे(Chandrakant Khaire) -इम्तियाज आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव हे गेल्यावेळचे खेळाडू पुन्हा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. वंचित आघाडीने सोडलेली साथ, इम्तियाज जलील यांच्याविरोधात दिलेला मुस्लिम उमेदवार, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अपेक्षित मतांच्या विभाजनाची मावळलेली शक्यता अशा अनेक अडचणींचा सामना इम्तियाज यांना करावा लागणार आहे. आम्हीच जिंकू असे म्हणत इम्तियाज जलील यांनी पतंगाची हवा करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
पण एमआयएमच्या पंतगाला यावेळी हवा कोणाची? याचे उत्तर मात्र अद्याप सापडलेले नाही. इम्तियाज जलील यांना शहरी भागात चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता असली तरी ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचे जाळे नसल्याने त्यांची अडचण होणार आहे. यावर ते कशी मात करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
निवडणूक प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर एमआयएमचे सर्वेसर्वा ओवेसी शहरात जाहीर सभा घेण्याची शक्यता आहे. ओवेसी यांच्या सभेनंतर शहरातील वातावरण निश्चितच बदलेल. तुर्तास इम्तियाज जलील रमजान ईद आणि त्यानिमित्त शहरात भरलेल्या बाजारात फेरफटका मारण्यात व्यस्त आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.