Chhatrapati Sambhajinagar Constituency : शिवसेना-भाजप दोघांचेही जिंकण्याचे दावे, पण लढणार कोण हेच ठरेना...

Shiv Sena-BJP Loksabha : गुढीपाडव्याच्या दिवशी महायुतीची कोंडी फोडून उमेदवार जाहीर होईल असे वाटत होते, पण पाडवा गोड झालाच नाही..
sandipan bhumre, bhagwat karad
sandipan bhumre, bhagwat karad Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : संभाजीनगरची जागा ही आमची पारंपरिक सीट आहे, ती आम्ही जिंकणार आहोत, मग सोडणार कशी ? असा दावा शिवसेना शिंदे गट करत आहे. तर भाजप या मतदारसंघात तीन वर्षांपासून काम करतो आहे, आमची बूथस्तरावर मजबूत बांधणी झालेली आहे, आम्ही ही जागा लढलो तर दोन लाखांच्या मताधिक्याने निवडून येऊ, असा दावा भाजपचे स्थानिक नेते करत आहेत.

शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांनी जिंकण्याचे दावे केले असले तरी जागा लढणार कोण? यावर मात्र अजूनही तोडगा निघू शकलेला नाही. शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट वारंवार शिवसेनेचा उमेदवार जाहीर होण्याचे मुहूर्त सांगत आहेत.पण योग्य मुहूर्त काही साधला जात नाहीये. आज गुढीपाडव्याला संभाजीनगर लोकसभेचा उमेदवार जाहीर होईल, असे चार दिवसापुर्वी पत्रकार परिषद घेऊन शिरसाट यांनी सांगितले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

sandipan bhumre, bhagwat karad
Ashok Chavan News : ज्या पक्षाने मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसवलं त्याच अशोक चव्हाणांनी काँग्रेसला धुतलं

शिवसेना (SHIV SENA) शिंदे गटाचे नेते शिरसाट यांनी या जागेबाबत जाहीर केलेला हा मुहूर्त इतर मुहूर्तांप्रमाणे टळला असेच म्हणावे लागेल. या मतदारसंघातील उमेदवारीबद्दल सस्पेंस अधिक ताणला गेल्याने सर्वसामान्य नागरिकांची उत्सुकताही आता हळूहळू संपू लागली आहे. महायुतीतील लोकसभा मतदारसंघाचे वाटप काही मतदारसंघातील वादामुळे रखडले आहे. दोन्ही बाजूंनी दावे आणि दबावतंत्राचा वापर सुरू असल्याने कोंडी फुटता फुटत नाही.

महाविकास (MAHA VIKAS)आघाडीने आज संयुक्त पत्रकार परिषद घेत आपले जागावाटप जाहीर केले. शिवसेनेने आपल्या 21 उमेदवारांची नावे याआधीच जाहीर केली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसचे निम्मे उमेदवार जाहीर झाले असून, त्यांनी प्रचार सुरू केला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून दावा केला जात असलेल्या संभाजीनगर, नाशिक, रत्नागिरी, सिंधूदुर्ग आणि पालघर या मतदारसंघांचा फैसला अद्यापही झालेला नाही.

sandipan bhumre, bhagwat karad
Latur Lok Sabha Constituency : काँग्रेस भवनात विजयाच्या संकल्पाची गुढी उभारत अमित देशमुखांची चाय पे चर्चा...

गुढीपाडव्याच्या दिवशी ही कोंडी फोडून महायुती आपला पाडवा गोड करेल, असे बोलले जात होते. परंतु दिवस सरत आला तरी महायुतीकडून आज वाद असलेल्या मतदारसंघातील उमेदवार जाहीर झालेले नाहीत. संभाजीनगरात स्थानिक नेते आणि शिवसेना-भाजपचे (BJP) मंत्री एकमेकांच्या भेटीगाठी घेत आहेत, चर्चा करत आहेत. पण संभाजीनगरची जागा कोण लढवणार? हे मात्र कोणीच सांगत नाही.

sandipan bhumre, bhagwat karad
Ajit Pawar Speech : दिल्लीत बायकोची पर्स फिरवत बसायला मी एवढा लेचापेचा वाटलो का?: अजितदादांचा सुळेंना टोला

भाजपकडून इच्छुक असलेले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी आपल्याकडे असलेल्या मराठवाड्यातील तीन लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, असे सांगून कराड उमेदवारी जाहीर होण्याच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत. अशीच अवस्था शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक असलेल्या मंत्री संदीपान भुमरे यांची झाली आहे.

(Edited By : Chaitanya Machale)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com