Dr.Bhagwat Karad News : लोकसभेचा चेंडू टोलवण्याची संधी डॉ. कराड यांना मिळणार का ?

Deputy Chief Minister Devendra Fadnavis to vacate Sambhajinagar seat to BJP :संभाजीनगरची जागा भाजपला सुटावी यासाठी स्थानिक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धरला आग्रह..
dr. bhagwat karad
dr. bhagwat karadSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : महायुतीतील लोकसभेचे जागा वाटप काही मतदारसंघावरून रखडले आहे. राज्यातील ज्या चार-पाच मतदारसंघाबद्दल शिवसेना-भाजपमध्ये वाद सुरू आहे त्यात प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगरच्या जागेचाही समावेश आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे या मतदारसंघातून इच्छूक तर आहेच, पण त्यांनी दोन वर्षापासून येथील संघटनात्मक बांधणीवर जोर दिला.

बुथ स्तरापासून वॉरिअर्स, शक्ती केंद्र प्रमुख, पन्नाप्रमुख अशी सगळीत तयारी भाजपने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केली. आता पर्यंत केंद्रातील दहा मंत्र्यांच्या शहरात सभा, मेळावे बैठका झाल्याचा दावा करत अकरा लाख मतदारांशी आम्ही थेट संपर्क केल्याचे कराड सांगतात. मात्र त्यांच्या या सगळ्या मेहनतीवर शिवसेना एकनाथ शिंदे (eknath shinde) गटाच्या दाव्यामुळे पाणी फिरण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

dr. bhagwat karad
Parbhani Loksabha Constituency : जानकरांना मराठा आंदोलकांनी गावातील मारुतीचे दर्शनही घेऊ दिले नाही..

संभाजीनगरची जागा भाजपला सुटावी यासाठी स्थानिक नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्याकडे टोकाचा आग्रह धरला आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगर च्या जागेवर ठाम असल्याने सध्या फडणवीसांनी मवाळ भूमिका घेतली आहे. परंतु इच्छूक उमेदवार कराड यांच्यासह जिल्ह्यातील भाजप नेत्यांना अजूनही देवेंद्र फडणवीस संभाजीनगरची जागा भाजपसाठी सोडवून घेतील, असा विश्वास वाटतो.

महायुती म्हणून शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित बैठका होऊन चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. जर मुंबईतील वरिष्ठ नेत्यांचीही या मतदारसंघाबद्दल अनेकदा चर्चा झाली आहे. मात्र अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 13 मे रोजी मतदान होणार आहे. अद्यापही महिनाभरापेक्षा अधिक वेळ असल्यामुळे राज्यातील नेते संभाजीनगरच्या जागेसाठी अजून काही काळ वाट पाहण्याच्या मनस्थित आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या (Bjp) जिल्ह्यातील नेत्यांनीही काही काळ थांबण्याची भूमिका घेत आढावा घेणे आणि नेत्यांना रिपोर्टिंग करणे एवढेच काम सध्या तरी सुरू ठेवले आहे.

dr. bhagwat karad
Lok Sabha Election: प्रेम 'यांच' आणि 'त्यांच' सेम नसतं...; कविता शेअर करत शेलारांनी ठाकरेंना डिवचलं

भागवत कराड यांनी उमेदवारीचा चेंडू आता वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टात ढकलला आहे. आता प्रत्यक्ष मैदानात उतरून उमेदवार म्हणून लोकसभेचा चेंडू खेळण्याची संधी कराडांना मिळते का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

(Edited by - Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com