Aurangabad High Court Order On Sanjay Shirsat Case News Sarkarnama
मराठवाडा

Sanajay Shirsat : टेंडरच्या वादातून शिवसैनिकाला केलेल्या मारहाण प्रकरणात संजय शिरसाट निर्दोष!

Aurangabad High Court Order : खेडकर यांनी टेंडर परत घेणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली. त्‍यावेळी शिरसाट यांनी शिवीगाळ करत तुला दाखवावे लागेल, असे म्हणत खेडकर यांच्या तोंडात चापट मारली.

Jagdish Pansare

  1. टेंडरच्या वादातून शिवसैनिकाला मारहाण केल्याच्या प्रकरणात मंत्री संजय शिरसाट आणि इतरांना निर्दोष मुक्तता मिळाली आहे.

  2. औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या या निकालामुळे छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरणात चर्चेला ऊत आला आहे.

  3. न्यायालयाने पुराव्याअभावी सर्व आरोपींना निर्दोष ठरवले असून, शिरसाट समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

High Court News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील शिवसेनेच्या माजी सभागृह नेत्याला टेंडरच्या वादातून मारहाण केल्याच्या प्रकरणात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह सहा जणांची गुन्हा सिद्द न झाल्याने निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी आर. एस. जांबोटकर यांनी दिले आहेत. माजी सभागृहनेते सुशील खेडकर यांनी वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रारी दिली होती.

त्यानुसार 18 जानेवारी 2020 रोजी आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मिस कॉल केल्याने सुशील खेडकर यांनी त्यांना कॉल केला. त्यावेळी तुमच्याशी टेंडरबाबात बोलायचे आहे, असे सांगत कोकणवाडी येथील संपर्क कार्यालयात बोलावले. म्हणून खेडकर यांच्यासह त्यांचे मित्र अनुप मुंदडा, दिलिप हेकडे असे तीघेजण शिरसाट यांच्या कार्यालयात गेले होते.

त्यावेळी शिरसाट यांनी सातारा देवळाई येथील टेंडर परत घेणार किंवा नाही, हे आताच सांग असे म्हणून आग्रह धरला. त्यावर शिवसैनिक (Shivsena) खेडकर यांनी टेंडर परत घेणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली. त्‍यावेळी शिरसाट यांनी शिवीगाळ करत तुला दाखवावे लागेल, असे म्हणत खेडकर यांच्या तोंडात चापट मारली. त्यावेळी उपमहापौर राजेद्र जंजाळ यांनी कॉलरला धरुन ओढले व चापट मारली.

तर राजू राजपूत याने लाथाबुक्क्यांनी मारले. विजय पैठणे व निलेश नरवडे यांनीही मारहाण खेडकर व इतरांना मारहाण केली. त्यामुळे खेडकर यांच्या डोक्याला मार लागून जखम झाली. पाठीवर व छातीवर मुक्का मार लागला. या प्रकरणी खेडकर यांच्या तक्रारीवरुन संजय शिरसाट यांच्याह अनिल बिरारे, विजय पैठणे, निलेश नरवडे, राजू राजपूत, राजेंद्र जंजाळ यांच्या विरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र न्यायालयात खेडकर यांनी भूमिका बदलत किरकोळ वाद झाला होता. त्यांना तीक्ष्ण हत्याराने मारहाण केली असे काही घडले नाही. पोलिस ठाणयात तक्रार दिली त्यावेळी फिर्यादीवर स्वाक्षरी बरोबर आहे. मात्र त्यावरील मजकूर माहिती नसल्याचे कथन केले. फिर्यादी व साक्षीदार यांनी अभियोग पक्षाच्या कथनाला कुठल्याही स्वरुपात दुजोरा दिला नाही.

शिवीगाळ केली, मारहाण केली, दमदाटी केली या सर्व बाबी न्यायालयात नाकारण्यात आल्या. सरकारी वकिलांनी घेतलेल्या उलट तपासणीतूनही काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे न्यायालयाने संजय शिरसाट यांच्यासह सर्वांची मुक्तता करण्याचे आदेश दिले.

FAQs

  1. प्रश्न: संजय शिरसाट यांच्यावर कोणत्या प्रकरणात गुन्हा दाखल होता?
    उत्तर: टेंडरच्या वादातून शिवसैनिकाला मारहाण केल्याच्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल होता.

  2. प्रश्न: या प्रकरणाचा निकाल कोणी दिला?
    उत्तर: औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणात निकाल दिला.

  3. प्रश्न: न्यायालयाने काय निर्णय दिला?
    उत्तर: न्यायालयाने संजय शिरसाट आणि इतर सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले.

  4. प्रश्न: या निकालाचा राजकीय परिणाम काय दिसतो?
    उत्तर: छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात शिरसाट यांना दिलासा मिळाला असून विरोधकांवर दबाव वाढला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT