Sanjay Shirsat : अरे रे.. संजय शिरसाट जाहीर कार्यक्रमात सख्ख्या भावाबद्दल हे काय बोलून गेले?

Sanjay Shirsat Criticise Her Brother: शनिवारी संजय शिरसाट यांच्या हस्ते सरळ सेवा भरतीद्वारे निवड झालेल्या अनुकंपा तत्त्वावरील 303 उमेदवारांना एका समारंभामध्ये नियुक्तीपत्रे देण्यात आली.
Sanjay Shirsat Speech News Chhatrapati Sambhajinagar News
Sanjay Shirsat Speech News Chhatrapati Sambhajinagar NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. आमदार संजय शिरसाट यांनी जाहीर कार्यक्रमात आपल्या सख्ख्या भावावरच टीका केली.

  2. त्यांनी सांगितले की, “वशिल्याने त्याला नोकरी मिळवून दिली, पण आता मलाच ओळखत नाही.”

  3. या वक्तव्यानंतर शिरसाट परिवारातील वाद आणि राजकीय तणाव चर्चेचा विषय ठरला आहे.

Shivsena News : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे आपल्या वादग्रस्त विधानामुळे अनेकदा अडचणीत आले. पण अशी विधानं करण्याची त्यांची मालिका काही केल्या थांबत नाहीये. एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी आपल्या भावाबद्दल केलेल्या टीकेमुळे पुन्हा एकदा त्यांनी वाद ओढवून घेतला आहे. वशिल्याने नोकरी लावलेल्या सख्ख्या भावाने सहा महिन्यात आपल्याकडे पाठ फिरवल्याचे सांगताना तुम्ही असं करू नका, असा उपदेश अनुकंपा तत्त्वावरील सरळ सेवाभरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना त्यांनी केला.

शनिवारी संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या हस्ते सरळ सेवा भरतीद्वारे निवड झालेल्या अनुकंपा तत्त्वावरील 303 उमेदवारांना एका समारंभामध्ये नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी भाषण करताना संजय शिरसाट यांची गाडी आपल्या भावावरच घसरली. जुन्या काळात थोडाफार वशिला चालत होता म्हणून भावाला नोकरीला लावले. पहिल्याच महिन्यात पगार झाल्यानंतर भाऊ माझ्याकडे आला. पेढ्याचा बॉक्स घेऊन पाया पडला, पहिला पगार माझ्या हातावर ठेवला.

मलाही आनंद झाला, त्याला म्हटलं आता घर चालवण्याची जबाबदारी तुझी. दोन महिने भावाने पगार आणून दिला, त्यानंतर मात्र तो मलाही भेटला नाही. नोकरी झाल्यावर लग्नासाठी त्याला वेटिंगवर ठेवू नये म्हणून लवकर लग्न लावून दिले. त्यानंतर मात्र नोकरीला लावून देणाऱ्या संजय शिरसाटलाही तो विसरला, तुम्ही मात्र असं करू नका, असा सल्ला संजय शिरसाट यांनी उपस्थित यांना दिला. संजय शिरसाट यांचे बंधू बाळासाहेब शिरसाट हे छत्रपती संभाजीगनर (Chhatrapati Sambhajinagar) महापालिकेत नगररचना विभागात उपअभियंता पदावर कार्यरत आहेत.

Sanjay Shirsat Speech News Chhatrapati Sambhajinagar News
Rohit Pawar On Sanjay Shirsat : ''सिडको'चे महापराक्रमी', असा टोला लगावला; मंत्री शिरसाटांच्या अतिवृष्टी पाहणी दौऱ्यावर रोहित पवार संतापले...

आमदार अनुराधा चव्हाण, महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आणि विविध विभागांचे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. नोकरी मिळालेल्या उमेदवारांना सल्ला देताना घरातील कौटुंबिक गोष्टी चव्हाट्यावर आणल्यामुळे संजय शिरसाट यांच्यावर टीका होऊ लागली आहे. वशिला लावून आपल्याच भावाला नोकरी मिळवून दिल्याचे मोठ्या अभिमानाने मंत्री कसे सांगू शकतात? अशा चर्चाही होऊ लागल्या आहेत.

Sanjay Shirsat Speech News Chhatrapati Sambhajinagar News
Shivsena UBT Politics: उद्धव ठाकरे यांचे आघाडीचे संकेत महापालिका निवडणुकीत कोणाची अडचण वाढवणार?

महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री झाल्यापासून संजय शिरसाट आणि वाद हे जणू समीकरणच बनले आहे. संधी मिळेल तेव्हा भाषणातून टोलेबाजी करणाऱ्या संजय शिरसाट यांचे कधीकधी भान हरपते याचा अनुभव अनेकांना आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत डीजे वाजवू नका, चांगला बँड आना, पैसे कमी पडत असतील तर माझ्याकडे या माझी बॅग उघडीच असते असे म्हणत, विरोधकांनी केलेल्या टीकेची शिरसाट यांनी खिल्ली उडवली होती.

माजलगाव येथे एका जाहीर कार्यक्रमात आपल्या मतदारसंघात कोणकोणत्या पक्षाच्या राजकीय नेत्यांच्या जमीनी आहेत याची यादी वाचून दाखवत शिरसाट यांनी अनेकांची कोंडी केली होती. कायम वादग्रस्त विधान करून चर्चेत राहणाऱ्या संजय शिरसाट यांनी आज जाहीर कार्यक्रमातून आपल्याच भावाबद्दल भाष्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

FAQs

1. संजय शिरसाट यांनी कोणावर टीका केली आहे?
त्यांनी आपल्या सख्ख्या भावावर टीका करत “विसरल्याचे” विधान केले आहे.

2. हे वक्तव्य कुठे करण्यात आले?
हे वक्तव्य एका जाहीर छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रमादरम्यान करण्यात आले.

3. शिरसाट यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया काय आहेत?
वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

4. शिरसाट बंधूंचा वाद राजकीय की कौटुंबिक आहे?
कौटुंबिक मतभेद आणि राजकीय पार्श्वभूमी दोन्ही कारणे आहेत.

5. याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
या वादामुळे स्थानिक पातळीवर वेगळीच चर्चा होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com