MLA Rajesh Tope News  Sarkarnama
मराठवाडा

MLA Rajesh Tope News : शरद पवारांचे विश्वासू राजेश टोपे संशयाच्या भोवऱ्यात?

NCP Political News : अजित पवारांची गुप्त भेट घेतली का ?

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मराठवाड्यातील बोटावर मोजण्याइतके जे आमदार आणि सहकारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत कायम राहिले त्यात राजेश टोपे यांचा समावेश होता. घनसावंगी मतदारसंघाचे आमदार असलेले राजेश टोपे यांच्या भोवती अनेकदा संशयाचे जाळे निर्माण झाले होते. पण टोपे यांनी आपल्याबद्दलच्या सगळ्या चर्चा निरर्थक ठरवल्या होत्या. (MLA Rajesh Tope News)

आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा राजेश टोपे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात गुप्त भेट घेतल्या दावा करत खळबळ उडवून दिली. लवादाच्या बैठकीला अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला राजेश टोपे यांनी हजेरी लावली होती. परंतु या बैठकीनंतर टोपेंनी अजित पवारांची गुप्त भेट घेत चर्चा केली, असा दावा मिटकरी यांनी माध्यमावर केला. केवळ टोपेच नाही, तर शरद पवार गटाचे सहा आमदार आमच्या संपर्कात आहेत, पुढे बघा काय धमाका होतो, असा इशाराही मिटकरी यांनी दिला. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता या गुप्त भेटीच्या दाव्यानंतर राजेश टोपे पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मात्र यावर टोपे यांनी कुठलेही भाष्य न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगाने दिलेल्या तुतारी या नव्या तुतारीचा प्रचार आपल्या मतदारसंघात सुरू केला आहे. जालना येथे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक नुकतीच पार पडली.

होऊ घातलेल्या आगामी लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ कमिटी स्थापन करणे, नवीन पदाधिकारी नियुक्त्या करणे, पक्षाला मिळालेले तुतारी हे चिन्ह लोकांपर्यंत पोहचविणे, जिल्ह्यात दुष्काळ पडल्याने गावागावात पिण्याच्या पाण्यासह सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पदाधिकारी यांनी कार्यतत्पर राहणे, आपल्या पक्षाला बळकट करण्यासाठी सक्रिय युवकांचे संघटन निर्माण करणे, ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्यांचे संघटनही गावोगावी मजबूत करणे या संदर्भात टोपे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

यावेळी सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे एकीकडे अमोल मिटकरी यांच्याकडून राजेश टोपे यांच्याबद्दल संशयाचे वातावरण निर्माण केले जात आहे. ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्यासाठीच पुण्यात गुप्तपणे भेटले, असे वातावरण तयार केले जात आहे. टोपे यांनी मात्र मिटकरी यांच्या दाव्यावर भाष्यही न करता नवे पक्षचिन्ह लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्ह्यात कामाला सुरवात केली आहे.

राजेश टोपे (Rajesh Tope) हे शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादी एकत्र असतांना टोपे यांचे शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे या सगळ्यांशीच कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. परंतु पक्षात फूट पडल्यानंतर टोपे यांनी शरद पवार यांचीच साथ देण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून टोपेंना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता मिटकरी यांनी केलेल्या दाव्यात किती तथ्य आहे, हे लवकरच स्पष्ट होईल.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT