Pune News : शरद पवार गटातील घनसांगवीचे आमदार राजेश टोपे यांनी आज (ता. २४ फेब्रुवारी) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे. टोपे हे पवारांची साथ सोडून अजितदादा गटात सामील होणार का, अशीही चर्चा आता रंगली आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. (NCP Crisis)
अजित पवार यांनी भाजप-शिवसेना युतीसोबत जाऊन उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आमदार राजेश टोपे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. टोपे यांनी आतापर्यंत शरद पवार यांच्याच नेतृत्वात राजकीय वाटचाल केली आहे. राजेश टोपे यांचे वडील माजी खासदार अंकुशराव टोपे हे शरद पवारांचे अतिशय जवळचे स्नेही होते. त्यामुळे राजेश टोपे यांनीही शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून आगामी काळात राजकीय प्रवास करण्याचे ठरविले आहे. (Ajit Pawar Vs Sharad Pawar)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पुण्यातील शासकीय विश्रामगृहात अजित पवार आणि राजेश टोपे यांच्यामध्ये भेट झाल्याची चर्चा आहे. टोपे यांचे काही कार्यकर्त्यांसोबतचे फोटोही व्हायरल झाले आहेत, त्यामुळे राजेश टोपे हे अजितदादांच्या गोटात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. (Maharashtra Politics)
दरम्यान, आपण रायगडावरील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाला मिळालेल्या चिन्हाचे अनावरण करण्यासाठी आलो होतो. आमच्या मुक्कामची सोय पुण्यातील शासकीय विश्रामगृहात करण्यात आलेली होती, त्यामुळे माझा मुक्काम पुण्यातील गेस्ट हाऊसला होता. अजितदादा हे त्यांच्या कामाच्या सवयीप्रमाणे गेस्ट हाऊसला असतील. गर्दी होती. बैठका सुरू होत्या. मी माझ्या रूममधून गाडीत आलो. खाली काही लोक भेटले, त्यांच्यासोबत फोटो काढला आणि गाडीत बसलो, असे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
टोपे म्हणतात माझी भेटच झाली
ते म्हणाले, माझी आणि अजितदादांची आज भेटच झाली नाही. त्यामुळे मी त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्न येत नाही. आमच्या शरदचंद्र पवार गटाला मिळालेल्या तुतारीचे अनावरण रायगडावर शरद पवार यांच्या उपस्थितीत होत आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण आता रायगडावर आहोत. पुण्यातून आम्ही हेलिकॉप्टरमधून रायगडला यायचं होतं, त्यामुळे आम्ही पुण्याला मुक्कामी आलो होतो.
मी रायगडावर पक्षाच्या चिन्हाचे अनावरण करण्यासाठी आलो आहे, याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या, असे सांगून राजेश टोपे यांनी आपण शरद पवार यांना सोडून कुठेही जाणार नसल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.