MLA Ramesh Bornare Appeal Eknath Shinde on Local Body Election 2025 News Sarkarnama
मराठवाडा

MLA Ramesh Bornare : एकनाथ शिंदेच्या आमदाराने दिला नगराध्यक्षपदासाठी फाॅर्म्युला, युतीत मिठाचा खडा पडणार?

Local Body Election 2025 Shivsena : जे आमच्या विरोधात लढले, तेच आता पुन्हा पक्षात येऊन नगराध्यक्ष पदाचे स्वप्न पाहत असतील तर योग्य नाही.

Jagdish Pansare

  1. आमदार रमेश बोरनारे यांनी केलेली एक मागणी महायुतीत नवा वाद निर्माण करू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

  2. या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे संकेत आहेत.

  3. महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा पृष्ठभागावर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Shivsena News : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी महायुतीची जोरदार तयारी सुरू आहे. मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्याचा आढावा घेतला. तर एकनाथ शिंदे यांनी गटप्रमुखांचा मेळावा घेत निवडणूकीच्या प्रचाराचा नारळच फोडला. याच मेळाव्यात आमदार रमेश बोरनारे, विलास भुमरे यांनी केलेल्या विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा पडतो की काय? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

बोरनारे यांनी नगराध्यक्षपदासाठीचा फाॅर्मुला सांगितला अन् त्याला समर्थकांनी टाळ्या वाजवून प्रतिसादही दिला. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात आमदारांनी केलेल्या भाषणाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांनी शिंदे यांच्यासमोरच नगराध्यक्ष पदासाठीचा फाॅर्म्युला राबवण्याची मागणी केली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या.

ज्याचा आमदार त्याचा नगराध्यक्ष हा फाॅर्म्युला शिंदेसाहेब खरचं राबवा. आमच्या या मागणीचा विचार कराच, कारण विधानसभेला जे आमच्या विरोधात लढले, तेच आता पुन्हा पक्षात येऊन नगराध्यक्ष पदाचे स्वप्न पाहत असतील तर योग्य नाही. बोरनारे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानसभा लढवलेले आणि आता परत भाजपमध्ये (BJP) परतलेले दिनेश परदेशी यांना हा टोला लगावला. वैजापूर नगर परिषदेत आम्ही तेरा नगरसेवक निवडून आणले, त्यामुळे जिथे ज्याचा आमदार, तिथे त्या पक्षाचा नगरसेवक हा फाॅर्म्युला राबवा, या मागणीचा पुनरुच्चार बोरनारे यांनी केला.

तेव्हा नेमका बोरनारे यांचा इशारा कोणाकडे? याची माहिती शिंदे यांनी संजय शिरसाट यांच्याकडून घेतली. विधानसभा निवडणुकीत महायुती असल्याने ऐनवेळी भाजपाचे माजी नगराध्यक्ष डाॅ. दिनेश परदेशी यांनी शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. विधानसभेची उमेदवारीही मिळवली, पण माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्या नाराजीचा फटका त्यांना बसला.

भाजपाकडू आयात केलेल्या परदेशी यांच्यासाठी आपल्याला डावलले या भावनेतून चिकटगांवकर यांनी थेट शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत बोरनारे यांच्यासाठी काम केले. परिणामी बोरनारे यांचा वैजापूरमधून सलग दुसरा विजय झाला. परंतु जे दिनेश परदेशी वैजापूरमध्ये बोरनारे यांच्याविरोधात लढले, त्यांनीच परत भाजपमध्ये घरवापसी केली.

आता नगर परिषदेतील सत्ता आणि नगराध्यक्षपद मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर बोरनारे यांनी केलेल्या मागणीने महायुतीत खडा पडण्याची शक्यता आहे. बोरनारे यांच्या या मागणीवर एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले नसले तरी यावर ते विचार निश्चित करू शकतात, असे बोलले जाते.

FAQs

1. आमदार रमेश बोरनारे यांनी कोणती मागणी केली आहे?
ज्या पक्षाचा आमदार, त्याच पक्षाचा नगराध्यक्ष झाला पाहिजे, अशी बोरनारे यांनी केली आहे.

2. ही मागणी का वादग्रस्त ठरत आहे?
कारण ती मागणी एका पक्षाच्या हिताविरुद्ध असल्याचे काही पदाधिकाऱ्यांचे मत असून त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.

3. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका काय आहे?
शिंदे यांनी अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही, परंतु त्यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

4. या मागणीचा महायुतीवर काय परिणाम होऊ शकतो?
महायुतीत अंतर्गत मतभेद वाढण्याची आणि काही ठिकाणी राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.

5. आमदार रमेश बोरनारे कोणत्या पक्षाचे आहेत?
ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) चे आमदार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT