Ramesh Bornare : 'राजकारणात आम्हाला तुझा मोठा अडसर, तू आमच्या डोक्यात बसलाय'; शिवसेना आमदाराकडून भाजप कार्यकर्त्याला मारहाण

Marathwada Political Crime : आमदार बोरनारे यांनी दोन वर्षांपूर्वीही मला अशीच जीवे मारण्याची धमकी दिली होती. बोरनारे यांची वैजापूर भागात मोठी दहशत असून मी आज सकाळी साडेअकरापासून दुपारी साडेतीनपर्यंत पोलिस ठाण्यात बसलो होतो. पोलिसांनी माझा फक्त अर्ज घेतला आहे. त्यांनी गुन्हा दाखल केलेला नाही.
Ramesh Bornare
Ramesh BornareSarkarnama
Published on
Updated on

Vaijapur, 17 May : मराठवाड्यातील मारहाणीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. संतोष देशमुखांच्या खुनानंतर आज बीडमधील दुसरी एक घटना उघडकीस आली आहे. ‘संतोष देशमुख पार्ट टू’ करायचा सांगून एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. बीडपाठोपाठ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमधील सत्ताधारी भाजप कार्यकर्त्याला शिवसेनेच्या आमदाराने बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. ‘तू खूप दिवसांपासून राजकारणात आमच्या डोक्यात बसलाय, तुझ्या फॅमिलीला संपवायचं आहे,’ अशी धमकी देत मारहाण केल्याचे भाजप कार्यकर्ते कैलास पवार यांनी सांगितले.

याबाबत भाजप कार्यकर्ते (BJP Worker) कैलास पवार यांनी वैजापूर पोलिस ठाण्यात तक्रारी दिली आहे. तक्रारीसोबत मारहाणीचा व्हिडिओही पोलिसांना दिला आहे. मात्र, पोलिसांनी अजूनही गुन्हा दाखल केला नाही, असा आरोप पवार यांनी केला आहे. त्यामुळे सत्ताधारी लोकांकडून मारहाणीच्या घटना घडत असल्याचे दिसून येत आहे.

कैलास पवार म्हणाले, शिवसेना आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare), त्यांचे उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, त्यांचा सहाय्यक, चालक आणि इतर दोन ते तीन कार्यकर्ते हे माझ्या घराशेजारी रस्त्याचे काम सुरू होते, त्याठिकाणी आज सकाळी अकरा वाजता आले होते. आज सुटी असूनही नगरपालिकेच्या इंजिनिअरला घेऊन ते त्या ठिकाणी आले होते. त्यांनी सांगितले की, प्लॅट नंंबर ४८ मधून नवीन रस्ता तयार करा. इंजिनिअर शंकर जोरे यांना मी रस्त्याचा लेआऊट बघून घ्या, असे सांगितले. त्यामध्ये रस्ता नाही.

मी नगरपालिकेच्या इंजिनिअरला रस्त्याच्या लेआऊटबाबत सांगताच आमदार रमेश बोरनारे यांनी लगेच मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तू खूप दिवसांपासून आमच्या डोक्यात आहे. तू खूप दिवसांपासून राजकारणात आमच्या डोक्यात बसलेला आहे. तुझ्या फॅमिलीसह तुझी बायको, लेकरं इथं राहता. तुम्हाला अगोदर संपवायचं आहे, असे धमकावत आमदार रमेश बोरनारे यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली, असे पवार यांनी नमूद केले.

Ramesh Bornare
Dr. Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकर आत्महत्या : आरोपी मुसळे मानेचा नवा दावा; बॅंक खात्यातील 70 लाख रुपये पगाराचे अन्‌ उसने घेतलेले...

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप यांनीही मला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर वैजापूरचे तालुकाप्रमुख राजेंद्र साळुंखे आणि त्यांचा पीए प्रदीप साळुंखे, साठे नावाचा त्यांचा ड्रायव्हर या पाच लोकांनी मला माझ्या घराजवळ बेदम मारहाण केली. मारहाण करून त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. ‘तू इथं वैजापूरला राहू नको. इथं राहिलं तर बघ. आम्हाला राजकारणात तुझा मोठा अडसर आहे,’ अशी धमकीही साळुंखे यांनी दिल्याचा आरोप पवार यांनी केला.

आमदार बोरनारे यांनी दोन वर्षांपूर्वीही मला अशीच जीवे मारण्याची धमकी दिली होती. बोरनारे यांची वैजापूर भागात मोठी दहशत असून मी आज सकाळी साडेअकरापासून दुपारी साडेतीनपर्यंत पोलिस ठाण्यात बसलो होतो. पोलिसांनी माझा फक्त अर्ज घेतलेला आहे. त्यांनी गुन्हा दाखल केलेला नाही.

Ramesh Bornare
Ashadhi Palkhi Wari : पालखी मार्गावरील तीन जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींना मोठा दिलासा; आषाढी वारीपूर्वी अनुदान देणार : गोरेंची घोषणा

पोलिसांना मारहाण आणि शिवीगाळ करताचा व्हिडिओही दिलेला आहे. मात्र, वैजापूरच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. त्यांनी माझ्याकडून अर्ज घेतला असून चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी उडवा उडवीची उत्तरे ते देत आहेत, असा आरोपही कैलास पवार यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com