NCP MLA Vikram Kale Minister News Sarkarnama
मराठवाडा

NCP Vikram Kale Minister News : आमदार काळेंना 'खुश कर डाला'; अजितदादांच्या मंत्र्यांनं मंत्रिमंडळाच्या विस्ताराला तोंड फोडलं

MLA Vikram Kale Likely to Become Minister Says NCP Leader Babasaheb Patil in Latur : औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांना बढती मिळणार असल्याचे संकेत सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.

Pradeep Pendhare

Latur Political News : राज्यातील महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल, सांगता येत नसले, तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विस्ताराच्या चर्चांना तोंड फोडले.

लातूर इथं एका कार्यक्रमात औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांना मंत्रि‍पदाची लाॅटरी लागणार असल्याचे जाहीर संकेत दिले. त्यामुळे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा रंगली आहे. पावसाळा अधिवेशन तोंडावर असतानाच, मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आमदार काळे यांना मंत्रिपद मिळणार असल्याचे सांगून, मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना तोंड फोडले.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सहकारमंत्री बाबासाहेब पाटील लातूर इथं एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातील आमदार विक्रम काळे मंत्री होणार असल्याची मोठी घोषणा करताना, फक्त त्यांनी कमी बोलावं, असा सल्ला दिला.

माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बनसोडे यांनाही, आपल्याच शिफारशींमुळे तिकीट मिळाल्याचा दावा यावेळी मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केला. उपमुख्यमंत्री अजितदादा (Ajit Pawar) मुख्यमंत्री व्हावेत, अशी ईच्छा आहे. अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास देशात क्रमांक एकचे मुख्यमंत्री ठरतील, असेही सहकारमंत्री पाटील यांनी म्हटले.

पावसाळी अधिवेशन तोंडावर आहे. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी आमदार काळे यांना मंत्रि‍पदाचे संकेत दिल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार होतो की काय, अशी चर्चा आता रंगली आहे. परंतु राज्यातील राजकीय परिस्थिती पाहाता, मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे दिसत नाही. त्यामुळे मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कोणत्या जोरावर आमदार काळे यांना मंत्रि‍पदाचे स्वप्न दाखवले याची देखील चर्चा आहे.

आमदार काळेंना बीड गु्न्हेगारी पॅटर्नचा झटका

दरम्यान, राज्यात बीडमधील गुन्हेगारीचा झटका आमदार विक्रम काळे यांना बसला आहे. आमदार काळे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगत एकाने वडवणी तालुक्यातील कान्हापूर गावच्या महिला सरपंचाला लाखो रूपयांना गंडा घातला आहे. महिला सरपंच राधा खताळ यांच्या पतीने उत्तरेश्वर खताळ यांनी बीड पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीवरून नयन जयराम शेजुळ (रा. छत्रपती संभाजीनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT