Mla Sashikant Shinde-Dcm Fadanvis News
Mla Sashikant Shinde-Dcm Fadanvis News Sarkarnama
मराठवाडा

Shashikant Shinde News : सरकार वाचवण्यासाठी आमदारांचे लाड, प्रत्येकजण स्वतःला गृहमंत्री समजतोय..

सरकारनामा ब्युरो

Vidhan Parisad : राज्यातील कायदा व सुव्यवस्था पुर्णपणे ढासाळली आहे, सत्ताधारी आमदार आपले आणि कार्यकर्त्यांचे अवैध धंदे वाचवण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. सत्ताधारी देखील सरकार वाचवण्यासाठी आपल्या आमदारांचे लाड पुरवत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार शशीकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी सभागृहात केला. अंतिम आठवडा प्रश्नावर बोलतांना त्यांनी कायदा व सुव्यवस्था, भ्रष्टाचार, आरोग्य, केंद्रीय तपास यंत्रणांचा सुरू असलेला गैरवापर यावर भाष्य केले.

शशिकांत शिंदे म्हणाले, राज्यातील सत्तांतरानंतर अवघ्या नऊ महिन्यात परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. (Maharashtra Budget) राज्यातील उद्योग धंदे बाहेर गेले, तरुणांच्या हाताला मिळणारा रोजगार बुडाला. आपल्याकडे असलेले भीमाशंकर ज्योतीर्लिंग थेट आसाममध्ये नेले. तेथील मुख्यमंत्र्यांनी हा दावा केला, ही सत्तांतराच्या वेळी झालेल्या गुवाहाटी दौऱ्याची परतफेड होती का? (Devendra Fadanvis) पोलिस यंत्रणेवर सरकारचे नियंत्रण राहिलेले नाही, अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे.

सरकारमधील प्रत्येक घटक मी गृहमंत्री असल्याच्या अविर्भावात वावरत आहे. पोलिस आयुक्तांना पर्याय निर्माण केला जातो, सरकारचा अधिकाऱ्यांवर विश्वास राहिलेला नाही का? विरोधकांवर तर हल्ले होतच आहेत, पण सत्ताधारी लोकांवर देखील हल्ले होत आहेत. ५०-६० लोक मिळून एका व्यक्तीवर हल्ले करतात, हल्लोखोरांवर किरकोळ आणि ज्याच्यावर हल्ला झाला त्याच्यावर कठोर कलम लावली जातात. पोलिसांवर दबाव आणला गेला, ठाणे जिल्ह्यात देखील असे प्रकार घडले.

कायदा व सुव्यवस्था राज्यात राहिलेली नाही, असेही शिंदे म्हणाले. आमदाराने गोळीबार केला, अहवाल आला, पण गोळीबार दुसऱ्याने केल्याचे सांगितले जाते. असा अहवाल देणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. महिनाभरात तीन ते चार गोळीबाराच्या घटना विविध ठिकाणी घडल्या. धाडस वाढले, कारण माझ्या मागे कोणी तरी आहे हे माहित असल्यामुळे गुन्हेगारी, बेकायदेशीर रस्ते, जुगार, दारूचे धंदे वाढले आहेत.

एक आमदार कार्यकर्त्यांचे अवैध धंदे टिकवण्यासाठी गेलो असे सांगतो. सत्तेचा असा गैरवापर सुरू झाला. आता तोच आमदार पुन्हा अरेरावी करायला लागला, असा टोला शिंदे यांनी आमदार संतोष बांगर यांचे नाव न घेता लगावला. पोलिस कारवाई करत नाही, त्यांच्यावर दडपण आणले जाते. राहूल गांधी यांच्यावर झालेली कारवाई ही दडपशाहीची सुरूवात आहे. उद्या खोट्या तक्रारी करून एखाद्याचे राजकीय आयुष्य उद्धवस्त केले जावू शकते. आता लोकशाही धोक्यात असल्याची चर्चा देशात सुरू झाली आहे.

कुटुंबापर्यंत जातात, त्यांना त्रास दिला जातो इतक्या खालच्या पातळीवर राजकारण गेले आहे. आता राजकारणात यावं की नाही असा विचार होवू लागला आहे. सभागृहातील अधिकारी मग्रुरीने वागतो, सभापतींनी सांगून देखील कारवाई होत नसले तर काय अर्थ आहे? असा सवाल देखील शिंदे यांनी उपस्थितीत केला. एखाद्या कुटुंबाला संपवण्याची भाषा केली जाते. सत्तातरानंतर मुंबईच काय राज्यातील इतर महापालिकांमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे. आमदार नाराज होवू नये यासाठी लाड सुरू आहेत. ते सांगतिल ते ते केले जात असल्याचा आरोप देखील शिंदे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT