Mumbai News : शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात स्वतःचं शस्त्र दुसऱ्याला दिल्यामुळे शस्त्रास्त्र कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांचा शस्त्र परवानाही रद्द होणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली आहे.
सदा सरवणकर यांनी त्यांना देण्यात आलेल्या शस्त्र परवान्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. तर सदा सरवणकर हे ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाचे सरकार सत्तेत असल्यामुळे त्यांना क्लिन चीट देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
या आरोपाला उत्तर देताना सदा सरवणकर यांना शस्त्र कायद्यांतर्गत नोटीस पाठवण्यात आली होती. या प्रकरणात सदा सरवणकर यांच्यासह ११ जणांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
नेमकं प्रकरण काय?
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या दरम्यान प्रभादेवी परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला होता. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. मात्र, आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला नसल्याचा अहवाल पोलिसांनी दिला होता.
पण ज्या बंदुकीतून गोळीबार झाला ती बंदूक ही सदा सरवणकर यांचीच होती. मात्र, गोळी झाडणारा व्यक्ती दुसरा होता, असा अहवाल पोलिसांनी दिला होता. सदा सरवणकर यांनी परवाना असलेली बंदूक इतर व्यक्तीला वापरण्यास दिल्यामुळे त्यांच्याकडून चूक झाल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं.
यामुळे त्यांचा शस्त्रास्त्र परवाना रद्द करण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. तसेच त्यांना क्लीन चिट मिळाली असली तरीही त्यांच्यावर कारवाई होणार आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.