Prakash Mahajan On Gopinath Munde-Fadnanvis News Sarkarnama
मराठवाडा

Prakash Mahajan On Gopinath Munde News : आधी चळवळीतून भाजपामध्ये लोक यायचे, आता भ्रष्टाचारातून येतात! प्रकाश महाजन यांचा फडणवीसांवर निशाणा

MNS leader Prakash Mahajan criticized the BJP, claiming that leaders once joined through movements, but now enter through corruption. : ज्यांच्याविरोधात गोपीनाथ मुंडे यांनी मोर्चा काढला होता तेच लोक आज भाजपसोबत सत्तेत आहेत, असा आरोपही महाजन यांनी केला.

Jagdish Pansare

Maharashtra BJP News : दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा आज अकरावा स्मृतीदिन. या निमित्ताने मनसे नेते आणि गोपीनाथ मुंडे यांचे मेहुणे प्रकाश महाजन यांनी भाजपवर टीका केली आहे. आधी भाजपमध्ये येणारे लोक हे चळवळीतून येत होते. स्वत: गोपीनाथ मुंडे यांनी हा पक्ष चळवळीतूनच मोठा केला. पण आता हा पक्ष प्रोफेशनल झाला असून आता या पक्षात लोक चळवळीतून नाही तर भ्रष्टाचारातून येतात, असा टोला महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

प्रकाश महाजन एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतील गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या काळातील भाजप आणि आजचा यावर भाष्य केले. ज्यांच्याविरोधात गोपीनाथ मुंडे यांनी मोर्चा काढला होता तेच लोक आज भाजपसोबत सत्तेत आहेत, असा आरोपही महाजन यांनी केला. छगन भुजबळ, अजित पवार, अशोक चव्हाण या नेत्यांची थेट नावेच त्यांनी घेतली. आज भारतीय जनता पक्षाची अवस्था पाहिल्यावर खंत वाटते. आता भ्रष्टाचारातून भाजपात एन्ट्री मिळते.

संभाजीनगरमध्ये सार्वजनिक सिंचन घोटाळ्यासंदर्भात एक मोर्चा निघाला होता. त्यात गोपीनाथ मुंडे यांचं डोकं फुटलं होतं. ज्याच्या विरोधात तो मोर्चा निघाला होता त्या नेत्याच्या बाजूला आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बसतात हे दुर्दैव आहे. संघर्षाच्या वेळी अनेक लोक भाजपसोबत होते. पण सत्ता आल्यानंतर ते कुठेच नाहीत. त्यामुळे भाजप आता प्रोफेशनल पक्ष झाला आहे, असेही महाजन म्हणाले.

गोपीनाथ मुंडे यांना काँग्रेसमध्ये जा, मुख्यमंत्री होशील, असा सल्ला आपल्या वडीलांनी दिला होता, असा दावा महाजन यांनी केला. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूच्या आदल्या रात्री एक बैठक झाली होती. त्यात मी महाराष्ट्रात आलो नाही तर आपण देवेंद्र यांच्या पाठीशी उभा राहू, असं गोपीनाथ मुंडे म्हणाले होते. त्यावेळी एका मोठ्या नेत्याचा देवेंद्र फडणवीसांच्या नावाला विरोध होता. पण गोपीनाथ मुंडे यांनी ते काही ऐकलं नाही, असेही महाजन यांनी सांगितले.

गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिना निमित्त पांगरी, ता. परळी येथील गोपीनाथ गडावर आज किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मंत्री पंकजा मुंडे, माजी खासदार प्रितम मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह हजारो मुंडे समर्थक आज गोपीनाथ गडावर उपस्थित होते. अभिवादनासाठी गोपीनाथ गडावर मोठी गर्दी जमली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT