MP Bajrang Sonawane -Amit Shah News Sarkarnama
मराठवाडा

MP Bajrang Sonawane Meet Amit Shah: संसदेचं अधिवेशन सुरू असतानाच पवारांच्या खासदारानं घेतली तडकाफडकी अमित शाहांची भेट

Beed Politics: बीड जिल्ह्यात घडलेले हा खुनाचा प्रकार गंभीर आहे, या घटनेचा मी निषेध करतो. बीडचा बिहार होतोय की काय? अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. मस्साजोगच्या सरपंचाला अपहरण करून त्याचे डोळे काढत क्रूर पद्धतीने मारण्यात आले आहे.

Jagdish Pansare

नवी दिल्ली : मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन खून, परळीत व्यापाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण या घटनांनी बीड जिल्हा हादरला आहे. अशा घटनांमुळे जिल्ह्यात दहशतीचे वातावरण असून राज्य पातळीवर जिल्ह्याची बदनामी होत आहे. मस्साजोग येथील माजी सरपंच देशमुख यांचे खून प्रकरण तर थेट दिल्लीतही चर्चेचा विषय ठरत आहे.

अशावेळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. बीड जिल्ह्यातील अपहरण, खुनाच्या घटनांबद्दल सविस्तर माहिती देत या सगळ्या प्रकरणांची सीबीआय मार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली. (Bajrang Sonawane) बीडचा बिहार होत आहे, असा संताप बजरंग सोनवणे यांनी माजी सरपंच देशमुख यांच्या खून प्रकरणावर प्रतिक्रिया देतांना व्यक्त केला होता.

पोलीस आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपही सोनवणे यांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणी बजरंग सोनवणे यांनी थेट अमित शाह यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष बीड जिल्ह्यातील खून प्रकरणाकडे वेधले. (Beed News) बीड जिल्ह्यात गुन्हेगारीने कळस गाठला असून जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी व्हावी, अपहरणांच्या प्रकरणांची सीबीआय मार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब यांची भेट घेतल्याचे बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे.

बीड जिल्ह्यात घडलेले हा खुनाचा प्रकार गंभीर आहे, या घटनेचा मी निषेध करतो. बीडचा बिहार होतोय की काय? अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. मस्साजोगच्या सरपंचाला अपहरण करून त्याचे डोळे काढत क्रूर पद्धतीने मारण्यात आले आहे. या खून प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक झाली पाहिजे. या आरोपींवर खंडणी मागितली म्हणून दोन दिवसाआधीच गुन्हा दाखल झाला होता, पण त्यांना लगेच जामीन मिळाला.

मी बीडच्या पोलिस अधिक्षकांना फोन केला पण त्यांनी माझा फोन उचलला नाही. माझ्याकडे सगळे रेकॉर्ड आहे, रात्री त्यांनी उशिरा फोन उचलला, असा आरोप सोनवणे यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना केला होता. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली असली तरी मुख्य आरोपीला पोलिसांनी पळवून लावायचे आहे का? असा सवाल सोनवणे यांनी केला होता.

परळीत एका व्यापाऱ्याला उचलून नेत त्याचे अपहरण करण्यात आले नंतर त्याच्याकडून पैसे, दागिने लुटून सोडून देण्यात आले. बलाढ्य नेते जिल्ह्यात आहेत, मग अशा घटना जिल्ह्यात का घडत आहेत? असा सवाल सोनवणे यांनी उपस्थित केला होता. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणीही बजरंग सोनवणे यांनी केली होती. योगायोगाने आज मुख्यमंत्री फडणवीस हे ही दिल्लीत होते आणि आजच बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवायांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT