Beed Political Crime News : बीड जिल्ह्यात केजमध्ये हॉटेलमध्ये दोन गटात सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या हॉटेल व्यावसायिक विलास घुले याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर केजसह बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याचे नाव समोर आले आहे. याप्रकरणात आता पुरवणी जबाबात सौरभ सोनवणे याचे नाव दाखल करण्यात आले आहे. दरम्यान परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी थेट विधीमंडळातच कारवाईची मागणी केली आहे.
यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून या प्रकरणावर बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना या प्रकरणात जर माझा मुलगा दोषी असेल तर शिक्षा झालीच पाहिजे पण या प्रकरणात जाणिवपूर्वक राजकारण केलं जातंय, मुंबईत बसून लोकांना चेतावलं जातंय असे म्हणत आमदार धनंजय मुंडे यांच्यावर टीका केलीय.
बीडच्या केज तालुक्यात २० जून रोजी हॉटेल व्यावसायिक विलास घुले याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. तर या हत्येमागे पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप विलास घुले याच्या कुटुबियांनी केला. तसेच या प्रकरणात त्यांनी बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभचा सहभाग असल्याचे सांगत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ज्यानंतर हे विधीमंडळात देखील गाजलं. येथे मंत्री पंकजा मुंडे आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी पटलावर मांडला.
विधानसभेत मुंडेंनी घुले यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित करत कटाचा सूत्रधार शोधण्याची मागणी केली. ज्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी या प्रकरणाची दखल घेण्याचे आदेश गृह खात्याला दिले आहेत. या आदेशानंतर विलास घुले खुन प्रकरणात IPS वेंकटराम यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठीत करण्यात आली आहे. आता पर्यंत या प्रकरणात 9 आरोपी अटकेत असून पुरवणी जबाबामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या पुत्राचे नाव घेण्यात आले आहे. यामुळे बीडसह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान आता होणाऱ्या विविध आरोपांवरून बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोनवणे यांनी, यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी केज तालुक्यात घडलेली घटना दुर्दैवी असून ही घटना कशामुळे घडली? का घडली? भाडणं का झाले? याचा तपास खोलात जाऊन व्हायला हवा. ज्यात घुले याची हत्या झाली.
पण आता या प्रकरणात जाणिवपूर्वक राजकारण केलं जात असून मुलाचं नाव घेतलं जात आहे. घुले कुटुंबियांचा संशय असेलही, मात्र आमच्याकडे किड लागलेले राजकारण केलं जातंय. मुंबईत बसून लोकांना चेतावलं जातंय, असा आरोप बजरंग सोनवणे यांनी केला. तर पोलिस यंत्रणेला आपण मदत करणार असून मुलगा, मी, कुटुंब आणि कार्यकर्ते तपासाला सहकार्य करतील असे आश्वासन दिले आहे.
याचवेळी खासदार सोनवणे यांनी मस्साजोग हत्याप्रकरणाचा संदर्भ देत धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले, तो काय नेता आहे का? त्याला नेता म्हणत्यात का? वाद लावणारे नेते राजकारणात अकार्यक्षम असतात, राजकारणात फिल्डवर उतरुन, रात्र-दिवस काम करावे लागते, मुंबईत बसून कामं होत नाहीत, मी काही भित्रा आहे का? बीडचा वाघ आहे, असा पलटवार केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.