Bajrang Sonawane News : खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला दुचाकी धडकली; तरूण जखमी, तर गाडीचे किरकोळ नुकसान!

MP car acciden News : सोनवणे यांच्या कारचे या अपघातात किरकोळ नुकसान झाले. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.
Bajrang Sonavane
Bajrang Sonavane Sarkarnama
Published on
Updated on

Beed Politics News : बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या उभ्या असलेल्या कारवर एक भरधाव दुचाकी येऊन धडकल्याने अपघात झाला. यात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनवणे यांच्या कारचे या अपघातात किरकोळ नुकसान झाले. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.

खासदार बजरंग सोनवणे हे बीडहून केजला जात असतांना मस्साजोग बसस्थानकावर त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला थांबली होती. यावेळी मागून आलेल्या एका भरधाव दुचाकीने त्यांच्या उभ्या असलेल्या गाडीला जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार खाली कोसळला, दुचाकीचा वेग जास्त असल्याने हा तरुण जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनवणे यांच्या गाडीचे या अपघातात किरकोळ नुकसान झाले असून काही काचा फुटल्याचे सांगितले जाते.

Bajrang Sonavane
Maharashtra Politics : दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

केज तालुक्यातील मस्साजोगच्या सरपंच पदासाठी मंगळवारी मतदान पार पडले. ही निवडणुक बिनविरोध व्हावी, यासाठी बजरंग सोनवणे यांनीही प्रयत्न केले होते. ही निवडणूक बिनविरोधच होणार असा दावाही त्यांनी केला होता. मात्र गेल्या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्या विरोधात केवळ 9 मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यानंतर स्वरुपानंद विरुद्ध अश्विनी देशमुख यांच्यात सरपंच पदासाठी आज थेट लढत झाली.

Bajrang Sonavane
Maharashtra Cabinet Meeting: मंत्रिमंडळ बैठकीला अडचणीत असलेल्या झिरवळांची दांडी; भोंदू खरात प्रकरणावर होणार चर्चा

मतदान केंद्रासमोर लोक जमा झाल्यावरून स्वरुपानंद देशमुख आणि धनंजय देशमुख समर्थकांमध्ये वादावादी झाली होती. पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करत जमावाला पांगवले होते. मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दुपारनंतर मस्साजोगमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर खासदार बजरंग सोनवणे दुपारी मस्साजोगमध्ये आले होते.

Bajrang Sonavane
Maharashtra News Update: दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

बसस्थानकजवळ ते रस्त्याच्याबाजूला थांबले होते. त्यांनी मतदानाचा आढावाही घेतल्याची माहिती आहे. पण याच वेळी त्यांच्या उभ्या असलेल्या कारवर एक दुचाकी येऊन धडकली आणि या किरकोळ अपघातात सोनवणे यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. दुचाकीस्वार हा वेगात येत होता, त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तो थेट सोनवणे यांच्या कारवर येऊन जोरात धडकला. या अपघातात बजरंग सोनवणे यांना कुठलीही इजा झालेली नाही.

Bajrang Sonavane
Sanjay Jadhav : उद्धव ठाकरेंचा परभणीचा 'वाघ'; शिंदेच्या ऑपरेशन 'टायगर'मध्ये अडकणार का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com