Omraje Nimbalkar Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Lok Sabha 2024 News : खासदार ओम राजेनिंबाळकरांनी दाखल केला पुन्हा उमेदवारी अर्ज; 'हे' आहे कारण...

Political News : ओमराजे आणि अर्चना पाटील यांच्या एबी फॉर्म आणि मालमत्ता प्रमाणपत्रामध्ये चुका आहेत. तसेच इतरही त्रुटी आढळून आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी दिली होती.

Sachin Waghmare

Dharashiv News : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील निवडणूक जाहीर झाल्यापासून विविध कारणांनी चर्चेत आहे. धाराशिवचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर व महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण त्यांच्या अर्जात त्रुटी आढळून आली होती. ओमराजे आणि अर्चना पाटील यांच्या एबी फॉर्म आणि मालमत्ता प्रमाणपत्रामध्ये चुका आहेत. तसेच इतरही त्रुटी आढळून आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी दिली होती.

महाविकास आघाडीचे शिवसेना (Shivsena) उमेदवार ओमराजे निंबाळकर (Om Rajenimbalkar) यांनी त्यानंतर गुरुवारी पुन्हा एक उमेदवारी अर्ज केला दाखल केला आहे. ओमराजे यांनी यापूर्वी अर्ज दाखल करताना एबी फॉर्म व इतर कागदपत्रे दिली नव्हती. त्यामुळे कागदपत्रे अपुरी असल्याने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी त्यांना सर्व त्रुटी पूर्ण करण्याची नोटीस बजावली होती. (Dharashiv Lok Sabha 2024 News)

उमेदवार ओमराजे आणि अर्चना पाटील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी 19 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, 19 एप्रिलपर्यंत त्रुटींची पूर्तता झाली नाही तर, दोन्ही उमेदवारांचे अर्ज बाद केले जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी ओंबासे यांनी स्पष्ट केले होते. त्यासोबतच दोन्ही उमेदवारांना जिल्हाधिकारी ओंबासे यांनी समज दिल्याची माहिती समोर आली होते.

त्यामुळे महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी गुरुवारी अर्ज दाखल करताना जिल्हाधिकारी ओंबासे यांनी नोंदवलेल्या आक्षेपांची पूर्तता करीत त्यासोबतच संपत्ती व इतर विवरण असलेले शपथ पत्र दाखल केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांनी आपल्या 'निष्ठे'ची सारी ताकद रस्त्यावर उतरवून, मंगळवारी धाराशिव शहरात मोठे शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि काँग्रेसचे नेते व माजी मंत्री अमित देशमुख (Amit deshmukh) यांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. यानंतर ठाकरे गटाची प्रचार सभा पार पडली. या सभेत आदित्य ठाकरे यांनी जोरदार भाषण करताना या वेळी त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार यांच्या महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला होता.

R

SCROLL FOR NEXT