Omraje Nimbalkar News Sarkarnama
मराठवाडा

Omraje On Talathi Bharti : सरकारने डोके ठिकाणावर आणावे : तलाठी परीक्षेतील गोंधळामुळे ओमराजे निंबाळकर भडकले !

Talathi Bharti : सोमवारी सकाळच्या सत्रात परीक्षा केंद्रावर सर्व्हर बंद पडल्याने विद्यार्थांमध्ये गोंधळ उडाला.

सरकारनामा ब्यूरो

Latur news : सरकारने डोकं ठिकाणावर आणावं, विद्यार्थांची ससेहोलपट थांबवा, अशी तीव्र प्रतिक्रीया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी व्यक्त केली आहे. लातूर व धाराशिव जिल्ह्यात १७ ऑगस्टपासून ऑनलाईन पद्धतीने तलाठी पदासाठीची परीक्षा (Talathi Bharti) होत आहे. मात्र, सोमवारी सकाळच्या सत्रात परीक्षा केंद्रावर सर्व्हर बंद पडल्याने विद्यार्थांमध्ये गोंधळ उडाला.

याबाबत प्रतिक्रीया देताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, सरकारने विद्यार्थांची ससेहोलपट थांबवावी, परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेची चौकशी करावी. या ऑनलाईन परीक्षेच्या उडालेल्या बोजवारामुळे त्यांनी सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच येणाऱ्या काळात सरकारने डोके ठिकाणावर आणून पुढील परीक्षांचे नियोजन व्यवस्थित करावे, जेणे करून ही परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना संधी मिळेल.

सरकारने प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी या परिक्षेकरता एक हजार रुपये शुल्क आकारले आहेत. येत्या १४ सप्टेंबरपर्यंत या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. या परीक्षेच्या माध्यमातून तब्बल चार हजार सहाशे तलाठी पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातून दहा लाख विद्यार्थ्यांनी तर लातूरमधून (Latur) दीडलाख आणि धाराशिव जिल्ह्यातून एक लाख पाच हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

मात्र, परीक्षेसाठी एक एक हजार रुपये घेऊनही ऑनलाईन परीक्षेत सतत अडथळे येत आहेत. मग शुल्क नेमकी कशासाठी आकारले, असा सवाल परीक्षा केंद्रावर अनेक परीक्षार्थींनी 'सरकारनामा'शी बोलताना केला.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT