Video OmRaje Nimbalkar Sarkarnama
मराठवाडा

Video Omraje Nimbalkar : खासदार ओमराजेंसाठी मंगलम योग...

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : लोकसभेच्या उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर सलग दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले. महायुतीच्या अर्चना पाटील यांचा तब्बल सव्वा तीन लाखावर मताधिक्याने पराभव करत ओमराजे यांनी हा विजय मिळवला.

आज संसदेच्या अधिवेशनात ओमराजे यांनी दुसऱ्यांदा खासदार पदाची शपथ घेतली. यानिमित्ताने घडलेल्या योगायोगाची माहिती ओमराजे यांनी आनंदाने एक्सवरील पोस्टच्या माध्यमातून दिली हा योगायोग म्हणजे ओमराजे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला तो दिवस, मतदान झाले तो दिवस, निकाल जाहीर झालो तोही दिवस आणि आज खासदार म्हणून शपथ घेतली त्या दिवशीचा वार हा एकच होता.

या सगळ्या घटना, प्रसंग, क्षण मंगळवारीच घडले. आपल्यासाठी हा मंगलमय योग असल्याचे ओमराजे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आज आई तुळजाभवानी च्या आशीर्वादाने खासदारकीची शपथ घेतली. फॉर्म भरला तो देखील मंगळवारी, मतदान देखील मंगळवारी, निकाल देखील मंगळवारी आणि आज शपथ घेतली तो देखील मंगळवारीच.

हा मंगलमय योगायोग धाराशिवच्या मायबाप जनतेसाठी शुभ होईल असे कार्य माझ्याकडून होऊ दे हीच सर्वांचे कुलदैवत आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना. दुसर्‍यांदा खासदारकी म्हणून शपथ आज घेतली पण जनतेची कामे ही कधीच खंड न पडता निवडणूक झाली त्या दिवसापासून लगेच सुरू केली. पुन्हा एकदा सर्व मायबाप जनतेचे मनापासून आभार, अशा शब्दात ओमराजे (Omraje Nimbalkar) यांनी शपथ घेतल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे मराठवाड्यातून तीन खासदार निवडून आले. यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होण्याचा विक्रम धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला. तब्बल 3 लाख 29 हजार 846 एवढ्या मताधिक्याने विजय मिळवला. विशेष म्हणजे महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी धाराशिवमध्ये सभा घेतली होती.

त्यानंतरही तब्बल 58.45 टक्के मतदान घेऊन ओमराजेंना विजय मिळाला. या शिवाय हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर, तर परभणीतून संजय जाधव हे सलग तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले आहेत. विशेष म्हणजे या दोघांनीही विरोधी उमेदवारांपेक्षा लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळवत विजय संपादन केला. शिवसेना ठाकरे गटाने मराठवाड्यात चार लोकसभेच्या जागा लढवल्या होत्या. त्यापैकी छत्रपती संभाजीनगर वगळता हिंगोली, परभणी आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघात या पक्षाने विजय मिळवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT