Parbhani Political News : पंकजा मुंडेंविरोधात कमेंटवर बोर्डीकर-भांबळे यांच्यात जुंपली

Pankaja Munde And Meghana Bordikar : पाचेगाव येथील कमेंट करणारा तरुण हा माजी आमदार विजय भांबळे यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप मेघना बोर्डीकर यांनी केला.
Pankja munde, meghna bordikar
Pankja munde, meghna bordikar sarkarnama
Published on
Updated on

विनोद पाचपिले-

Jintur News : राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू आहे. अगदी गावपातळीवर या वादाचे पडसाद उमटू लागले आहेत. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभेच्या बीड मतदारसंघात पराभव झाल्यानंतर विशिष्ट समाजाकडून त्यांच्याविरोधात समाज माध्यमांवर चुकीच्या पोस्ट, कमेंट व्हायलर केल्या जात आहेत. अशाच एका पोस्टवरून जिंतूर तालुक्यातील राजकारण तापले.

राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे आणि भाजपच्या विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर यांच्यातील राजकीय वैर तालुक्याला नवे नाही. अनेकदा या दोघांमधील वादामुळे अडचणीचा प्रसंग उद्भवला होता. आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याविरोधात जिंतुर तालुक्यातील एका तरुणाने आक्षेपार्ह कमेंट केल्याने या दोन नेत्यामध्ये जुंपली आहे.

पाचेगाव येथील कमेंट करणारा तरुण हा माजी आमदार विजय भांबळे यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांनी केला. भांबळे यांच्या फेसबुकवर त्यांच्या सत्कार करताना या कार्यकर्त्याचे अनेक छायाचित्रे असल्याचा दावा करत त्यांच्या सांगण्यावरूनच संबंधित तरुणाने पंकजा मुंडे यांच्याविरोधात अश्लिल कमेंट केल्याचा गंभीर आरोप बोर्डीकर यांनी केला आहे.

लगोलग विजय भांबळे यांनी प्रसिद्धि पत्रक जारी करत मेघना बोर्डीकर यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. आपण कायम महिलांचा आदर करतो, एखाद्या व्यक्तीने सोबत फोटो काढण्याचा आग्रह केला म्हणजे तो माझा कार्यकर्ता आहे, असे सांगून आरोप करणे चुकीचे असल्याचे भांबळे यांनी म्हटले आहे. समाज माध्यमावर काही व्यक्तींनी महिला नेत्याबद्दल अश्लील भाषेत मजकूर लिहून सामाजिक भावना दुखावल्या आहेत.

Pankja munde, meghna bordikar
Lok Sabha Session News : नव्या मराठी खासदारांनी पहिल्याच दिवशी दिल्ली गाजवली;'है तयार हम' म्हणत वज्रमूठ आवळली !

मला सर्व समाज व महिलांविषयी आदर आहे. राजकीय जीवनात माझ्या सोबत अनेक व्यक्ती फोटो काढत असतात. हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीसोबत माझा फोटो प्रोफाईलवर असल्याचा काही राजकीय व्यक्ती गैरफायदा घेऊ इच्छित असून त्यास वेगळे वळण देत आहेत.

मी सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या विकृत लिखाणाचा व मानसिकतेचा तीव्र निषेध करतो. प्रत्येक नागरिकाने दुसऱ्या समाजाविषयी व महिलांविषयी आदराची भावना ठेवाली पाहिजे, असे म्हणत भांबळे यांनी मेघना बोर्डीकर यांच्यावरच त्या या घटनेचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा पलटवार केला.

तर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कुठल्याही समाजाला पटणारा नसून कार्यकर्त्यांना बळ देऊन त्यांना महिला आमदार व महिलांविषयी समाज माध्यमावर अश्लील भाषेत लिहायला कोण प्रोत्साहन देतो ? हे सर्वांना माहीत आहे. श्री तुळजाभवानी साखर कारखाना बंद पडल्या बद्दलच्या अफवा कार्यकर्त्यांना फेसबुकवर कोणी पसरवायला लावल्या ? हे ही जनतेला माहीत आहे.

Pankja munde, meghna bordikar
Abdul Sattar : विधानसभेपूर्वी अब्दुल सत्तारांचा मास्टर स्ट्रोक! अल्पसंख्याक आयुक्तालय थेट संभाजीनगरातच...

पंकजा मुंडे यांच्याबद्दल विकृत लिखाण करणाऱ्या तरुणाची आठ दिवसांपूर्वी भेट घेऊन त्याला माजी आमदार विजय भांबळे यांनी प्रोत्साहित केल्याचा आरोप मेघना बोर्डीकर यांनी केला. कमेंट करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी या प्रकरणावरून बोर्डीकर-भांबळे यांच्यात मात्र आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे.

Pankja munde, meghna bordikar
Pandharpur Politics : आरोग्यमंत्र्यांसमोरच भाजप पदाधिकाऱ्याचा पारा चढला; तर सावंतांनीही भाजपच्या आजी-माजी आमदारांना फटकारलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com