Raosaheb Danve-kalyan kale Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve News : रावसाहेब दानवेंचे खासदार काळेंना ओपन चॅलेंज, 'मी 5 हजार कोटींची रस्ते केले, तुम्ही एक करून दाखवा'

Raosaheb Danve Vs Kalyan Kale : भोकरदन विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला हजार मतांचे मताधिक्य काय मिळाले, तालुक्यात बारा भावी आमदार तयार झाले, असा टोला दानवे यांनी लगावला.

Tushar Patil

Raosaheb Danve News : लोकसभेच्या जालना मतदारसंघात माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यापासून विद्यमान खासदार डाॅ. कल्याण काळे आणि त्यांच्यात कलगीतुरा सुरू आहे. भोकरदनमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत पुढील 25 वर्ष मी तुमच्या आशिर्वादने खासदार राहू शकतो, असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला होता. रावसाहेब दानवे यांनी त्याच ठिकाणी आभार दौरा करत काळे यांना आज (रविवारी) चॅलेंज दिले.

मी जालना लोकसभा मतदारसंघात पाच हजार कोटींचे रस्ते केले, तुम्ही पाच वर्षात एक करून दाखवा, अशा शब्दांत दानवेंनी काळेंना चॅलेंज दिले.

भोकरदन विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला Congress हजार मतांचे मताधिक्य काय मिळाले, तालुक्यात बारा भावी आमदार तयार झाले, असा टोला दानवे यांनी लगावला. तसेच 'शेर हमेशा आगे के दरवाजेसे आता है' असे म्हणत आपण विधान परिषद, राज्यसभेच्या माध्यमातून कुठलेही पद घेणार नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

खासदार कल्याण काळे यांच्या सत्कारच्या निमिताने भोकरदनमध्ये काँग्रेसने जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. रावसाहेब दानवे यांचे निवासस्थान असलेल्या भोकरदनमध्ये काल (शनिवारी) कल्याण काळे, माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी दंड थोपटत रावसाहेब दानवे यांना डिवचले होते. काळेंच्या या आव्हानाला रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर देत प्रतिआव्हान दिले.

भोकरदन शहरातील ज्या श्रीकृष्ण मंगल कार्यालयात खासदार काळे यांनी सत्कार स्वीकारत मी 25 वर्ष खासदार राहू शकतो. या मतदारसंघाची तशी परंपराच आहे, असे म्हणत रावसाहेब दानवे Raosaheb Danve यांना टोला लगावला होता. त्याच कार्यालयात आभार दौऱ्याची बैठक घेत रावसाहेब दानवे यांनी काळे यांना 5 वर्षात एक रस्ता करून दाखवा, अशा शब्दात डिवचले.

25 वर्ष विरोधी पक्षामध्ये

मी संघर्षातून तयार झालेला राजकीय कार्यकर्ता आहे. 40 वर्षाच्या राजकारणात 25 वर्ष मी विरोधी पक्षामध्ये काम केले आहे. त्यामुळे पदाची मला कुठलीही लालसा नाही. मी पक्षाला कुठलेही पद मागणार नाही. वाघासारखाच लढून पुन्ह पद मिळवेन, अशा आत्मविश्वास दानवे यांनी यावेळी व्यक्त केला.

निवडणूक ना कामावर झाली ना रामावर

नरेंद्र मोदी सरकारच्या शपथविधीच्या दिवशी भोकरदानमधील रहिवाशांना सर्वात जास्त दुःख झाले. ज्यांनी माझ्या विरोधात मतदान केले ते पण दुःखी होते. त्यांनी माझ्याकडे येऊन भावना व्यक्त केल्या. चूक झाली नसती तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे हे शपथ घेत असते, असेही अनेकांनी बोलून दाखवल्याचे दानवे यांनी सांगितले. लोकसभेची निवडणूक ना कामावर झाली ना रामावर, ती काँग्रेसच्या अपप्रचारावर झाल्याचे दानवे म्हणाले.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT