Santosh Bangar
Santosh Bangar Sarkarnama
मराठवाडा

माझी सुरक्षा काढून घ्यावी : शिवसेनेच्या बंडखोर आमदाराचे ‘एसपीं’ना पत्र

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर गेलेल्या शिवसेनेच्या (Shivsena) बंडखोर आमदारांना राज्य सरकारडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र, हिंगोलीच्या कळमनुरीचे बंडखोर आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी ही सुरक्षा काढून घेण्यात यावी, असे पत्र जिल्हा पोलिस अधीक्षकांना (SP) दिले. मात्र, पोलिस प्रशासनाकडून त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे पोलिस आक्रमक बांगरांची सुरक्षा काढून घेणार की कायम ठेवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (My security should be taken away: Rebel MLA Santosh Bangar's letter to police)

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून तब्बल ४० आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांना उघड समर्थन दिले आहे. मात्र, राज्यातील शिवसैनिकांचा रोष पाहता या बंडखोर आमदारांना एकनाथ शिंदे यांच्या सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. मात्र, कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी आपली सुरक्षा काढून घेण्यात यावी, अशी विनंती जिल्हा पोलिस अधीक्षकांना केली आहे.

हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षकांना आमदार संतोष बांगर यांनी पत्र दिले आहे. त्यात त्यांनी म्हटलेले आहे की, आपल्याला प्रदान करण्यात आलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा काढून घ्या, अशी विनंती केली आहे. मात्र, हिंगोली पोलिसांनी बांगर यांच्या पत्रावर अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे बांगरांची सुरक्षा कायम ठेवणार की काढून घेणार, याकडे हिंगोली जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

मराठवाड्यातील शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून आमदार संतोष बांगर यांची ओळख आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कोकणात जाऊन कोथळा काढू अशी धमकी दिल्याने आमदार बांगर हे चर्चेत आले होते. आमदार बांगर हे कायम ठाकरे घराण्याची एकनिष्ठ होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर त्यांनीदेखील ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात एंट्री केली आहे.

अगदी शिंदे गट मुंबईत येऊपर्यंत संतोष बांगर हे ठाकरेंशी एकनिष्ठ होते. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही त्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूनेच मतदान केले होते. मात्र, अविश्वास प्रस्ताव ठरावावर होणाऱ्या मतदानादिवशी त्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र, त्यांच्या पत्राने पुन्हा एकदा बांगर चर्चेत आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT