कल्याण डोंबिवलीत शिवसेनेला खिंडार; तब्बल ५५ नगरसेवक शिंदे गटात सामील

कल्याण डोंबिवलीतील सर्व नगरसेवकांनीही आम्ही सर्वजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याचेच सांगितले आहे.
Kalyan Dombivali's corporators
Kalyan Dombivali's corporators Sarkarnama
Published on
Updated on

डोंबिवली : मुंबई, ठाण्यातील नगरसेवकांनी एकमताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठिंबा दिल्यानंतर आता कल्याण डोंबिवलीतील (Kalyan Dombivali) नगरसेवकांनीही गुरुवारी (ता. ७ जुलै) रात्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना समर्थन दिले. यामध्ये सुमारे ५५ नगरसेवक आणि शिवसेनेचे (Shivsena) वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. (55 corporators from Kalyan Dombivali support Chief Minister Eknath Shinde)

मुंबई, ठाणे महापालिकेच्या बहुतांश नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले आहे. कल्याण डोंबिवलीतील सुमारे ५५ नगरसेवकांनीदेखील शिंदे यांना समर्थन दिले आहे. गुरुवारी रात्री नगरसेवक, शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

Kalyan Dombivali's corporators
राज्यपाल शिंदे-भाजप गटाला सत्तास्थापनेसाठी कसं आमंत्रित करु शकतात? शिवसेना पुन्हा न्यायालयात

शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे कल्याण डोंबिवलीमध्येदेखील पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. काही नगरसेवक हे बाहेरगावी आहेत, तर काही प्रकृती अस्वास्थ्यामुळे या वेळी उपस्थित राहू शकले नाहीत. कल्याण डोंबिवलीतील सर्व नगरसेवकांनीही आम्ही सर्वजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याचेच सांगितले आहे, असे खासदार शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईतील नंदनवन या शासकीय निवासस्थानी या सर्व नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही भेट घेतली.

Kalyan Dombivali's corporators
शिंदे सरकारबाबत महादेव जानकरांचा मोठा दावा; म्हणाले, ‘हे सरकार...’

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सेना भाजपा युतीची सत्ता राहिली आहे. कल्याण हा शिवसेनेचा, तर डोंबिवली हा भाजपचा बालेकिल्ला आहे. मागील महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. त्यावेळी सेनेचे ५२, तर भाजपचे ४२ नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेने भाजपला कडवी झुंज दिली होती. आगामी निवडणुका लक्षात घेता शिवसेनेने आपली ताकद वाढविण्यास सुरवात केली होती. यातूनच भाजपच्या ७ नगरसेवकांनी काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता, शिवसेनेच्या तीन नगरसेवकांचे निधन झाले आहे.

Kalyan Dombivali's corporators
भाजपच्या बड्या नेत्यावर 'हनिट्रॅप'चे जाळे : मुंबईत घर, दोन कोटींची केली मागणी

महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत निर्माण झालेली दुफळी भाजपच्या पथ्यावर पडणारी ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजप यांचे सरकार राज्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे असा संभ्रम असलेल्या शिवसेनेच्या सैनिकांनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com