Nagpur Assembly Session News Sarkarnama
मराठवाडा

Nagpur Assembly Session News : अब्दुल सत्तारांची हुकूमशाही मोडून काढा, अंबादास दानवे गरजले..

Jagdish Pansare

Opposition Leader Danve News : नागपूर विधीमंडळ अधिवेशनातील वातावर शेवटच्या टप्प्यात असतांनाच चांगलेच तापले आहे. दाऊद इब्राहिम, इक्बाल मिर्ची, सलीम कुत्ता या कुख्यात दहशतवाद्यांशी राजकीय नेत्यांचे संबंध व त्यावरून आरोप-प्रत्यारोपही रंगले. (Nagpur Assembly Session News) अधिवेश शेवटच्या टप्प्याकडे असतांना आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे.

जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी राज्याचे अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर अधिवेशानाच्या सुरुवातीलाच गंभीर आरोप केले होते. आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही सत्तार यांच्यात मतदारसंघातील हुकूमशाहीचा मुद्दा उपस्थितीत करत त्यांच्यावर हल्ला चढवला.

खोट्या कादपत्रांच्या आधारे मेडिकल काॅलेज लाटण्याचा त्यांच्या प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप करत दानवे यांनी सभागृहात खळबळ उडवून दिली. (Marathwada) अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे 2018 पासून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नसतानाही कागदोपत्री हॉस्पिटल दाखवून मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा घाट घातला आहे. या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याने तक्रार केली तर त्याच्यावर हल्ला करण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशेष म्हणजे युतीच्या काळात ही हुकुमशाही सुरू असून ती मोडून काढली पाहिजे, अशी मागणी दानवे यांनी सभागृहात केली. सिल्लोड नगर परिषदेत सत्तार यांची एकहाती सत्ता असल्यामुळे या जोरावर ते मनमानी करत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पक्ष कार्यालया समोर संरक्षक भिंत बांधण्यासाठी सिल्लोड नगरपालिकेचा वापर केला गेला.

या हुकुमशाही प्रवृत्ती बाबत पोलिस तक्रार दाखल करण्यासाठी काही गेले तर ती दाखल करून घेतली गेली नाही. विशेष म्हणजे भाजपच्या नेत्यांकडूनही त्यांना कसलीही सुरक्षा दिली जात नसल्याचे दानवे यांनी सांगितले. खासगी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी सुपरस्पेशालिटी रुग्णालय सुरू असणे आवश्यक आहे. परंतु असे कुठेलही रुग्णालय नसताना ते केवळ कागदोपत्री दाखवून 300 खाटाचे वैद्यकीय महाविद्याल व 60 खाटांचे आयुर्वेदिक रुग्णालय सुरू करण्यासाठी

परवानगी घेतली जात आहे. अब्दुल सत्तार हे सरकारमधील एक जबाबदार मंत्री असतांना त्यांच्याकडूनच असा खोटारडेपणा होत असेल तर दाद कोणाकडे मागायची. काही महिन्यांपुर्वीच याच मंत्री महाशयांच्या मुलांची नावे शिक्षक पात्रता भरती घोटाळ्यातही आली होती, याची आठवणही दानवे यांनी यावेळी करून देत सत्तारांना घेरले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT