Nagpur Winter Session: मुख्यमंत्री शिंदेंचं रेशीमबागेत हेडगेवारांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन

CM Eknath Shinde In RSS Office: हेडगेवार यांच्या दर्शनाने ऊर्जा आणि प्रेरणा मिळते; मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया..
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Nagpur News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रेशीमबागेत जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. त्यानंतर हेडगेवार यांच्या दर्शनाने ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, अशी प्रतिक्रियाही मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

'नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन असताना दरवर्षी रेशीमबागेत येऊन डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतो. येथे आल्यावर ऊर्जा मिळते. येथे येण्यामध्ये आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांमध्ये काहीच राजकरण नाही. आमचे हिंदुत्व हे विकासाचे हिंदुत्व आहे. आम्ही सर्वांना बरोबर घेऊन काम करत आहोत', असे शिंदे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

CM Eknath Shinde
RSS News: अजित पवार गटाच्या आमदारांची नागपुरातील संघाच्या कार्यक्रमाला दांडी

'आमचे सरकार सर्वसामान्य माणसाचे सरकार आहे. सर्वसामान्य माणूस कधीही मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो, असे आमचे सरकार आहे. जनतेच्या सेवेची प्रेरणा येथून घेऊन काम करत आहोत. आम्ही देशाला काय देणार, हा विचार डॉ. हेडगेवार यांनी दिला', असेही मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

दरम्यान, रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिभवन परिसराला भेट देताना त्यांच्याबरोबर शिवसेना (शिंदे गट) आमदार भरत गोगावले यांच्यासह अनेक नेते होते. तत्पूर्वी भाजपच्या सर्व आमदारांनी रेशीमबागेत जाऊन स्मृती मंदिर परिसरात डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले होते.

(Edited by- Ganesh Thombare)

CM Eknath Shinde
Nagpur Winter Session: हिवाळी अधिवेशन लांबणार की गुंडाळणार ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Uddhav thackeray, eknath shinde, jaykumar gore
Eknath Shinde-Pratap Sarnaik
Eknath Shinde .jpg
Eknath Shinde  Jyoti Waghmare
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com