Nagpur Assembly Session News  Sarkarnama
मराठवाडा

Nagpur Assembly Session News : राजेश टोपेंकडून बिहार, बंगालच्या बोगस डॉक्टरांची पोलखोल..

Jagdish Pansare

MLA Rajesh Tope News : राज्याचे माजी आरोग्य मंत्री आमदार राजेश टोपे यांनी आज विधानसभेत परराज्यातून आलेल्या बोगस डॉक्टरांचा मुद्दा उपस्थितीत केला. बिहार, बंगालमधून आलेल्या या बोगस डॉक्टरांमुळे विशेषतः ग्रामीण भागातील लोकांच्या जीवाशी खेळ होतो आहे. (Nagpur Assembly Session) या बोगस डॉक्टरांवर कारवाई कधी करणार? असा सवाल राजेश टोपे यांनी उपस्थितीत केला.

नागपूर विधीमंडळ अधिवेशनात टोपे (Rajesh Tope) यांनी राज्यातील आरोग्या संबंधित प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. बोगस डाॅक्टर आणि त्यांचाकडून राज्याच्या ग्रामीण भागात चालवल्या जाणाऱ्या बोगस, लॅब, खोटे रिपोर्ट या सगळ्यांची पोलखोल केली. (NCP) राज्यात बंगालचे आणि बिहारचे वैद्यकीय ज्ञान नसणारे पण डॉक्टरची पाटी लावणारे बोगस डॉक्टर मोठया प्रमाणात कार्यान्वित आहेत.

हे लोक ग्रामीण व दुर्गम भागातच दवाखाने सर्रास थाटत असून ग्रामीण भागात लॅब चालवण्याची परवानगी नसताना देखील लॅब चालवत आहेत. (Maharashtra) अनेक रुग्णांना कॅन्सरसह अनेक दुर्धर आजार असल्याचा बोगस रिपोर्ट देत भोळ्या,अज्ञानी व निरक्षर लोकांचा गैरफायदा घेत आहेत. राज्यातील बोगस डॉक्टरांवर शासनाने तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याशिवाय राज्यातील अनेक भागात डॉक्टरांवर हल्ले होण्याच्या घटना वारंवार घडत असून रुग्णाचे नातेवाईक डॉक्टर किंवा स्टाफ यांना मारहाण करतात. धाक दाखवतात, हॉस्पिटलची तोडफोड करतात असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. कायदा हातात घेतला जात आहे. हल्ला करणार्‍यांसाठी सरकारने कायदा केलेला असून हल्ला करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल होत नाही. याबाबत शासनाने त्वरीत लक्ष घालावे, अशी मागणीही टोपे यांनी सभागृहात केली.

उच्चशिक्षणाचा दर्जा खालावला..

उच्च शिक्षणामध्ये दर्जा हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. बीए झालेल्या विद्यार्थ्याला अर्ज लिहिता येत नाही, त्याच्या नोकरीसाठीच्या अर्जात अनेक चुका आढळतात इतका दर्जा खालावलेला आहे. आज इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा झालेल्या ग्रॅज्यूएट विद्यार्थ्याला मार्केटमध्ये एखाद्या डेली वेजेसप्रमाणे दहा ते बारा हजार पगार मिळतो.

नफेखोरीच्या दृष्टीकोनातून खासगी विद्यापीठे निर्माण व्हावीत, अशी अपेक्षा शासनाची बिलकुल नसली पाहिजे. तिथल्या फीस व्यवस्थित आकारल्या जातात का ? परीक्षा व्यवस्थित घेतल्या जात आहेत का ? हे शासनाने समिती नेमून तपासले पाहिजे. शासनाला पुढच्या पिढीची काळजी जर असेल तर शासनाने आणलेल्या अम्ब्रेला बीला मध्ये बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. घाई गडबडीत हे बिल पास न करता त्यातील त्रुटी दुरुस्त कराव्यात, अशी मागणीही बीलावरील चर्चेत सहभागी होतांना टोपे यांनी केली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT