Delhi News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद थेट निवडणूक आयोगात पोहोचला. यावर आयोगात सुनावणी देखील पार पडली. 8 डिसेंबरला दोन्ही गटांचा युक्तिवाद पूर्ण झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाला लेखी म्हणणं मांडण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. या अनुषंगानेच आज शुक्रवारचा दिवस लेखी सबमिशन सादर करण्यासाठी शेवटचा दिवस आहे.
अजित पवार गटाने आयोगाला आपले लेखी सबमिशन सादर केले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडूनही आज संध्याकाळपर्यंत लेखी सबमिशन सादर केले जाण्याची शक्यता आहे. आयोगाने गेल्या सुनावणीवेळी दोन्ही गटांना आठ दिवसांचा वेळ दिला होता. आता आजच्या सबमिशननंतर आयोग निकाल कधी देतं, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, निवडणूक आयोगासमोरील सुनावणीदरम्यान "सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा आम्हालाच असून, आम्हीच खरा पक्ष आहोत", असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला होता. तर पक्षाची संघटना वाढवण्यामध्ये अजित पवार यांची कोणतीही भूमिका नाही, असा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला होता.
आयोगासमोरील सुनावणीवेळी दोन्ही गटाने जोरदार युक्तिवाद केला होता. युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर लेखी सबमिशन सादर करण्यासाठी आयोगाने आठ दिवसांचा वेळ दिला होता. आता अजित पवार (Ajit Pawar) गटाने आपले लेखी सबमिशन सादर केले आहे. तर शरद पवार गटही लेखी सबमिशन सादर करण्याची शक्यता आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह कोणाचं ? याबाबत निवडणूक आयोग (Election Commission) लवकरच निर्णय देण्याची शक्यता आहे.
(Edited by- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.