Nagpur Winter Session: हिवाळी अधिवेशन लांबणार की गुंडाळणार ?

Maharashtra Assembly Winter Session 2023 : कामकाज सल्लागार समितीची दुपारी ३ वाजता तातडीची बैठक
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील आज दुसरा दिवस आहे. त्यामुळे विविध मुद्यांवरून विरोधक महायुती सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. सोमवारी विधानपरिषदेत सलीम कुत्ता प्रकरणी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली होता. त्यामुळे अधिवेशनाचा आजचा दिवस देखील गाजण्याची शक्यता आहे.

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला असल्यामुळे या प्रश्नावर अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. याबरोबरच धनगर आरक्षणावरही विशेष चर्चा होणार असल्याची माहिती आहे. यातच विरोधक हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी करत आहे. मात्र, सरकार 20 डिसेंबरपर्यंतच अधिवेशन घेण्यावर ठाम असून अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याच्या विचारात नसल्याचे बोलले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Winter Session 2023 : सभागृहाची इच्छा असेल तर बीड जाळपोळप्रकरणी दोन दिवसांत एसआयटी; फडणवीसांची घोषणा

या पार्श्वभूमीवरच विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची दुपारी 3 वाजता बैठक होणार पडणार आहे. या बैठकीत विरोधकांच्या मागणीवर चर्चा होणार असून त्यानंतर हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवायचा की नाही? याबाबत अंतिम निर्णय होणार आहे.

वडेट्टीवारांनी काय मागणी केली होती ?

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी किमान दोन दिवस वाढवण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे. अधिवेशनाचा कालावधी का वाढवण्यात यावा, यासाठी त्यांनी काही कारणे सांगितली आहेत. हिवाळी अधिवेशन (Winter Session) विदर्भात होत असल्यामुळे विदर्भातील प्रश्न मार्गी लागण्यासाठी तसेच वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा होण्यासाठी या अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणी वडेट्टीवारांनी केली.

याच अनुषगांने विधानसभा कामकाज सल्लागार समितीची मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची दुपारी 3.30 वाजता महत्त्वाची बैठक होणार पडणार आहे. विरोधी पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्व आमदारांचे लक्ष लागले आहे.

सरकार अधिवेशन गुंडाळणार ?

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याच्या विरोधकांच्या मागणीनंतर विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची दुपारी बैठक होणार आहे. असे असले तरी मात्र, राज्य सरकार हे अधिवेशन गुंडाळणार असल्याची शक्यता आहे. सरकार 20 डिसेंबरपर्यंतच अधिवेशन घेण्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Ajit Pawar : अजितदादा हेडगेवार अन् गोळवलकरांना अभिवादन करण्यासाठी रेशीमबागेत जाणार? 'ही' माहिती आली समोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com