Namdev Shastri On Dhananjay Munde .jpg Sarkarnama
मराठवाडा

Namdev Shastri: बीडमधून मोठी बातमी! नामदेव शास्त्रींच्या अडचणी वाढल्या; अनुयायांकडून हातपाय तोडण्याची भाषा, पोलिसांत तक्रार दाखल

Bhagchand Jhanje Allegations : महंत नामदेव शास्त्रींच्या धनंजय मुंडेंबाबतच्या भूमिकेवर टीकात्मक भाष्य करणाऱ्या बीडमधील भागचंद महाराज झांजे यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे.

Deepak Kulkarni

Beed News : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी गंभीर आरोप केले जात असतानाच मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.यातच त्यांनी भगवान गडावर जात महंत नामदेव शास्त्रींची (Namdev Shastri) भेट घेतली होती. त्यानंतर शास्त्रींनी मुंडे हे गुन्हेगार नसून त्यांना टार्गेट केलं जात असल्याचं म्हणत त्यांचं समर्थन केलं होतं. या समर्थनानंतर त्यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठवण्यात आली होती. यातच आता शास्त्रींच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

महंत नामदेव शास्त्रींच्या धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) भूमिकेवर टीकात्मक भाष्य करणाऱ्या बीडमधील भागचंद महाराज झांजे यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. नामदेव शास्त्रींच्या अनुयायांकडून झांजे यांना फोनवरुन महाराष्ट्रात फिरू देणार नाही, तंगडे तोडू, जीवे मारू, ठोकून काढू, अशाप्रकारे धमकावलं जात असल्याची तक्रार त्यांनी बीड पोलिस अधीक्षकांकडे दिली आहे.

याचवेळी त्यांनी माझ्या जीविताचं काही बरं-वाईट झालं तर याला भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज आणि त्यांचे अनुयायीच जबाबदार असतील,असंही भागचंद महाराजांनी पोलीस अधिक्षकांना दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे.

झांजे महाराज म्हणाले, महंत नामदेव शास्त्रींच्या विधानावर आपण संवैधानिक मार्गाने प्रतिक्रिया दिली. चूक झाली असेल तर गुन्हा दाखल करण्यात यावा, पण आपल्याला जीवे मारण्याची धमकी का देत आहात असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला असून शास्त्रींनी माझ्यावर वार करण्याची धमकी देणाऱ्या अनुयायांना आवर घालावा असं आवाहनही केलं आहे.

भागचंद झांजे महाराज नेमकं काय म्हणाले होते..?

हभप भागचंद झांजे महाराज यांनी धनंजय मुंडेंच्या पाठीशी भगवान गड उभा आहे असं विधान केलेल्या महंत नामदेव शास्त्रींवर टीकेची झोड उठवली होती.ते म्हणाले होते, ज्या गुंडाचं, आरोपींचं तुम्ही समर्थन करणं हे संत महात्म्यांच्या तोंडून बोलणं योग्य नाही.ज्या भगवान गडानं विखुरलेल्या वंजारी समाजाला एकत्र केलं.वारकरी संप्रदायाला एक दिशा दिली, अशा गडाचे आपण महंत आहात. त्यामुळे अशा महंतांकडून एका गुंडाचं, राजकीय नेत्याचं समर्थन करणं हे चांगलं नाही असंही त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं

तसेच हा देश संविधानावर चालतो.कायद्यावर विश्वास ठेवून आरोपींचं जे व्हायचं ते होईल.पण अशाप्रकारे वारकरी परंपरेतला एखादा महान व्यक्ती जर असं वक्तव्य करत असेल तर ग्रामस्थांचं,वारकऱ्यांचं संत महात्म्यांवरील विश्वास उडल्याशिवाय राहणार नाही,अशी टीका झांजे महाराज यांनी नामदेव शास्त्रींवर केली होती. त्याचमुळे त्यांना महंतांच्या अनुयायांकडून धमक्या दिल्या जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT