Nanded BJP Politics Sarkarnama
मराठवाडा

Nanded BJP Politics : अशोक चव्हाण यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यास चिखलीकर एवढे आतुर का ?

Nanded News : अशोक चव्हाण हे कितीही पक्षाशी एकनिष्ठ आहेत असे सांगत असले तरी ते भाजप मध्येये तील, असा दावा चिखलीकरांनी केला.

Jagdish Pansare

Marathwada Political News : राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे कालच नांदेड दौरा करुन गेले. (Nanded BJP Politics) त्यांच्या या दौऱ्यात काँग्रेस, शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. पुढील महिन्यात या तीनही पक्षातील मोठे नेते आणि पदाधिकारी भाजपमध्ये येणार असल्याचेही बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

त्यानंतर भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांनी पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला हवा दिली. खरतरं चव्हाण भाजपमध्ये आले तर चिखलीकरांचीच अडचण होणार आहे ? एकमेकांचे कट्टर विरोधक असूनही चिखलीकर अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यास एवढे आतुर का? असा प्रश्न त्यांच्या समर्थकांना निश्चितच पडला असेल. तर त्याचे झाले असे की, बावनकुळे यांच्या उपस्थीत झालेल्या प्रवेश सोहळ्यात म्हणे बावनकुळे यांनी चिखलीकरांच्या कानात अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार असल्याचे सांगितल्याचे बोलले जाते.

झालं थेट प्रदेशाध्यक्षांनीच सांगितल म्हटल्यावर चिखलीकर तरी गप्प कसे बसतील त्यांनी माध्यमांसमोर येऊन `अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील आणि मी त्यांचे स्वागत करेल`, असे सांगून टाकले. (Congress) त्यामुळे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. अशोक चव्हाण हे कितीही पक्षाशी एकनिष्ठ आहेत असे सांगत असले तरी ते भारतीय जनता पक्षात येतील, असा दावा चिखलीकरांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चव्हाण यांनी वारंवार भाजपा प्रवेशाच्या चर्चे खंडण केले असले तरी भाजपच्या राज्य आणि नांदेडच्या स्थानिक नेत्यांकडून मात्र ही चर्चा केलीच जात आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेडच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत मुखेड व नांदेड येथे नांदेड लोकसभा मतदारसंतील शंभर वाॅरिअर्सच्या बैठकीचे आयोजन केले होते. मुखेड येथील बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पक्षाचा दुप्पटा घालण्यासाठी अनेक मंडळी उत्सुक आहेत. अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, असा दावा केल्याचे चिखलीकरांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

मला आशा आहे की ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील. अशोक चव्हाणांच्या काळात न झालेली मदत भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केली आहे.भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना हा नांदेड जिल्ह्यातील सर्वात तोट्यातला कारखाना आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने या कारखान्याला दिडशे कोटींची मदत दिली, अशी चर्चा आहे व .ही माहिती मी वृत्तपत्रातून वाचली आहे. ते जेव्हा भाजप नेत्यांकडे मदतीसाठी हात पसरत आहेत. तेव्हा ते पक्षातही प्रवेश करतील, असे माझे मत असल्याच चिखलीकर म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT